चंदीगड- पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयात शरण ( Navjot Singh Sidhu surrendered before a court ) आले. 34 वर्षे जुन्या रस्ते अपघात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ( Navjot Singh Sidhu road rage case ) सुनावली आहे. सिद्धूचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही दिलासा मिळण्याच्या आशेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तेथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही.
काँग्रेसचे प्रवक्ते तथा नवज्योत सिद्धूयांचे वकील अभिषेक मनु सिंघवी ( Navjyot Sidhus lawyer Abhishek Manu Singhvi ) यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर ( chief justice M M Khanvilkar ) यांच्या खंडपीठासमोर नवज्योतसिंग सिद्धूच्या प्रकरणाचा उल्लेख केला. अभिषेक मनू सिंघवी यांनी सिद्धू ( Health problems of Navjyot Siddhu ) यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत शरण येण्यासाठी काही काळ वाढवून देण्यात विनंती केली. त्यावर न्यायमूर्ती खानविलकर म्हणाले की, हे प्रकरण विशेष खंडपीठाशी संबंधित आहे. याप्रकरणी सरन्यायाधीशांकडे अर्ज दाखल करून सुनावणीची विनंती करावी.
कायदेशीर पर्याय पाहिले जाणार-सुत्रांच्या माहितीनुसार नवज्योतसिंग सिद्धू प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत शरण करण्यासाठी वेळ मागणारी याचिका दाखल करणार आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांना सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. असे असले तरी त्यांच्या वकिलांकडून कायदेशीर पर्याय पाहिले जात आहेत. तपासणी अहवालांचा आधार घेत नवज्योतसिंग सिद्धू हे प्रकृतीची स्थिती सुधारण्यासाठी वेळ वाढविण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात 51 दिवसांच्या उन्हाळी सुट्ट्या-आजपासून सर्वोच्च न्यायालयात २० मे नंतर ५१ दिवसांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत. आजनंतर 51 दिवस उन्हाळी सुट्ट्या असतील. या कालावधीत केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होईल. मात्र, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी उन्हाळी खंडपीठाव्यतिरिक्त पाच खंडपीठांची स्थापना केली आहे. या खंडपीठात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांची सुनावणी करण्यात येणार आहे.