लखीमपूर खेरी (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी उशिरा भीषण अपघात झाला. येथे एका ट्रकने धडक दिल्याने 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातात 10 ते 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. एसपी गणेश साहा यांनी सांगितले की, चौकी राजापूर परिसरातील पांगी खुर्द गावात बहराइच रोडवर कार आणि स्कूटी यांच्यात धडक झाली. यानंतर काही लोक रस्त्यावर जमा झाले. दरम्यान, एका ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना धडक दिली. त्यात ५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांचे ट्विट : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी येथील रस्ता अपघाताची दखल घेतली आहे. योगाी यांनी ट्विट करत लखीमपूर खेरी येथील रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीवर तीव्र दु:ख व्यक्त केले. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. एसपी गणेश साहा यांनी सांगितले की, सदर कोतवाली भागातील पांगी खुर्द गावाजवळ पिलीभीत बस्ती रस्त्यावर बहराइचकडे जाणाऱ्या एका कारने सायंकाळी 7.30 च्या सुमारास समोरून येणाऱ्या स्कूटीस्वाराला धडक दिली, त्यात तो जखमी झाला. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. त्याचवेळी बहराइचकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रक गर्दीला चिरडवित खड्ड्यात पडला. ट्रकमधील बहुतेक जण पांगी गावातील रहिवासी होते. अपघात एवढा वेदनादायी होता की घटनास्थळी डझनभर लोक जखमी झाले.