महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशमधील झांशीत अपघात; 11 भाविकांवर काळाचा घाला, 6 जखमी - झांशीमध्ये अपघात

भाविक पंडोखरहून चिरगावकडे ट्रॉलीने जात होते. या दरम्यान, अचानक एक जनावर वाटेत आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॉली पलटली. या भीषण दुर्घटनेत 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य केले आणि सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले

झांशीमध्ये अपघात
झांशीमध्ये अपघात

By

Published : Oct 15, 2021, 5:09 PM IST

झाशी (उत्तर प्रदेश) -येथील चिरगाव पोलीस स्टेशन परिसरात ऐन दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात झाला आहे. एका प्राण्याला वाचवण्याच्या प्रयत्नात देवीच्या भक्तांनी भरलेली ट्रॉली उलटली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. तर 6हून अधिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -वळण रस्ता नव्हे तर सरळ मार्गच धोक्याचे! राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक अपघात सरळ मार्गांवर!

स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य

भाविक पंडोखरहून चिरगावकडे ट्रॉलीने जात होते. या दरम्यान, अचानक एक जनावर वाटेत आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॉली पलटली. या भीषण दुर्घटनेत 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य केले आणि सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, दाखल केलेल्यांपैकी 11 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामध्ये 7 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. तर 6हून अधिक जखमी झाले आहेत, ज्यांना झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये एका चारचाकीने 9 वर्षाच्या मुलाला चिरडले; घटना सीसीटीव्हीत कैद

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडून दु:ख व्यक्त

या घटनेविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली. मृतांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details