गिरिडीह (झारखंड) Road Accident in Giridih : झारखंडमधील गिरिडीहमध्ये भीषण अपघात झालाय. लग्न आटोपून परतणारं वाहन झाडावर आदळल्यानं झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील बागमाराजवळ आज पहाटे हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच मुफसिल पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश पासवान घटनास्थळी पोहोचले आणि घटनेत जखमी झालेल्या दोन मुलांसह चार जणांना सदर रुग्णालयात पाठवले. तसंच सहा मृतांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
चारचाकी झाडावर आदळल्यानं अपघात : अपघाताबाबत सांगितले जातंय की, या वाहनाचा वेग खूप होता. यामुळं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगानं जाणारी स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी कसंबसं लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. या अपघाताची माहिती मिळताच मुफसिल पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश पासवान आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तातडीनं रुग्णालयात पाठवले. त्यांनी पाचही मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत तिथं त्यांच शवविच्छेदन केलं जाणार आहे.
लग्नाहून परतताना अपघात : मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद फारुख अन्सारी यांचा मुलगा चांद रसीद याचा विवाह मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील तिकोडीह येथील पप्पू अन्सारी यांची मुलगी मुस्कान प्रवीण हिच्यासोबत निश्चित झाला होता. नियोजित वेळेनुसार 17 नोव्हेंबरच्या रात्री जागर झाला. अशा स्थितीत थोरिया येथून निघालेली वरात तिकोडीह येथे पोहोचली होती. लग्न झाल्यानंतर 10 जण चारचाकी वाहनानं थोरियाकडे निघाले. गाडीचा वेग जास्त होता आणि मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीजवळील बाघमारा इथं येताच चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय. तर दोन मुलांसह चार जण जखमी झाले आहेत.
पाच जणांचा मृत्यू : या घटनेत झारखंड मुक्ती मोर्चा (अल्पसंख्याक मोर्चा) जिल्हा उपाध्यक्ष असगर अन्सारी यांचा पुतण्या 31 वर्षीय सगीर अन्सारी व्यतिरिक्त युसूफ मियाँ गजोडीह, इम्तियाज अन्सारी, इम्तियाज अन्सारी यांच्यासह पाच जण जखमी झाले आहेत. वृद्ध सुभान अन्सारी गजोडीह यांचे निधन झालं. या घटनेमागे वेग आणि झोप ही कारणं असल्याचं असगरनं सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेस नेते नरेश वर्मा यांनीही सदर रुग्णालयात पोहोचून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर सीपीआय (एमएल) नेते राजेश सिन्हा यांनी नुकसान भरपाईची मागणीही केलीय.
हेही वाचा :
- Mumbai Accident News : भरधाव कारच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
- Road Accident In Kashmir : तीनशे फूट दरीत कोसळली बस: दोडा जिल्ह्यात भीषण अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू
- Kanpur News : अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहताना एक चूक भोवल्यानं दोघांचा मृत्यू, नेमकी घडली कशी घटना?