लखनऊ -उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. वेगाने येणाऱ्या ट्रक्टरने एका बसला जोरदार धडक दिली. यात 18 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 15 लोक गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात भीषण अपघात; 18 जणांचा जागीच मृत्यू
06:19 July 28
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात भीषण अपघात; 18 जणांचा जागीच मृत्यू
घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले. या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून 2 लाखाची मदत जाहीर केली. तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
लखनऊ-आयोध्या राष्ट्रीय मार्गावर हा अपघात झाला. लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री दीड वाजता घडल्याची माहिती आहे. बस हरयाणाकडून बिहारकडे जात होती. तेव्हा रामसनेहीघाट भागात एक्सेल टुटल्यामुळे बस खराब झाली. दुरुस्त करण्यासाठी बस थांबवण्यात आली होती. तेवढ्यात वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली आणि मोठा अपघात झाला.
दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू -
देशातील वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. रस्ते अपघात आणि त्यातील मृतांची संख्या बघितली तर आपल्या देशात रस्ता सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे जाणवते. सरकारी आकडेवारीनुसार देशात रस्ते अपघातात दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक लोकांना अपघातामुळे कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते.