अररिया (बिहार) -बिहारमधील अररिया जिल्ह्यात कारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात जाणारी कार रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याने पलटी झाली. त्यात श्वास गुदमरल्याने त्या सर्वाचा मृत्यू झाला. ही घटना पलासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली.
भरधाव कार खड्ड्यात कोसळली; श्वास गुदमरल्याने पाच जणांचा मृत्यू - पलासी थाना अररिया
भरधाव वेगात जाणारी कार रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याने पलटी झाली. त्यात श्वास गुदमरल्याने त्या सर्वाचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या अररिया जिल्ह्यातील पलासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली.
पाच जणांचा मृत्यू
कारमधील सर्वजण अनंत चतुर्थीनिमित्त यात्रेसाठी गेरारी गावाला गेले होते. यात्रेनंतर कलियागंजकडे जाताना एका वळणावर कार अनियंत्रत झाली. त्यामुळे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार पडली. कारचालक सोनू यादवने उडी टाकल्याने तो बचावला. मात्र इतर पाच जणांचा त्यात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. पोलिसांनी सर्वांना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तसेच पोलीस पुढील तपास करित आहे.