महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Samajwadi Party Rajya Sabha Candidate : समाजवादी पक्षाकडून राज्यसभेकरिता जयंत चौधरी यांचे नाव जाहीर

समाजवादी पक्षाने नुकतेच जावेद अली खान ( Samajwadi Party Javed Ali Khan ) आणि कपिल सिब्बल यांना राज्यसभेच्या 3 जागांवर उमेदवारी ( Kapil Rajya Sabha seat ) दिली होती. तिसर्‍या नावावर डिंपल यादवची चर्चा होती. पण, सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव यांची ( Dimple Yadav Rajya Sabha seat ) उमेदवारी जाहीर केली नाही. अशा स्थितीत डिंपल यादव राज्यसभेच्या सदस्य होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यसभेकरिता जयंत चौधरी यांचे नाव जाहीर
राज्यसभेकरिता जयंत चौधरी यांचे नाव जाहीर

By

Published : May 26, 2022, 6:57 PM IST

लखनौ -समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी तिसरे नाव ( Samajwadi Party finalized Jayant Chaudhary ) आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी यांचे निश्चित केले आहे. समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून त्याची अधिकृत घोषणा करण्यात ( Jayant Chaudhary Rajya Sabha candidate ) आली आहे. जयंत चौधरी हे सपा आणि राष्ट्रीय लोकदलाकडून राज्यसभेचे संयुक्त उमेदवार असतील, असे ट्विटमध्ये लिहिले आहे. याआधी डिंपल यादव राज्यसभेवर जाणार असल्याचे वृत्त आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंपल यादव ( Dimple Yadavs candidature ) आझमगडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढवू शकतात.

समाजवादी पक्षाने नुकतेच जावेद अली खान ( Samajwadi Party Javed Ali Khan ) आणि कपिल सिब्बल यांना राज्यसभेच्या 3 जागांवर उमेदवारी ( Kapil Sibbal Rajya Sabha seat ) दिली होती. तिसर्‍या नावावर डिंपल यादवची चर्चा होती. पण, सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव यांची ( Dimple Yadav Rajya Sabha seat ) उमेदवारी जाहीर केली नाही. अशा स्थितीत डिंपल यादव राज्यसभेच्या सदस्य होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गुरुवारी तिसर्‍या नावाची घोषणा करताना सपाने सांगितले की, आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी सपाच्यावतीने राज्यसभेचे सदस्य असतील.

डिंपल आझमगडमधून पोटनिवडणूक लढवू शकतात- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांना राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन दिले होते. अखिलेश यादव आता ते आश्वासन पूर्ण करत आहेत. त्याचवेळी डिंपल यादव आझमगडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढवू शकतात, असे सपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

जावेद अली आणि कपिल सिब्बल यांनी भरले नामनिर्देशन- सपाने 25 मे रोजी जावेद अली खान यांना राज्यसभेसाठी नामांकन दिले आहे. तर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या कपिल सिब्बल यांना पाठिंबा दिला आहे.

3 खासदारांचा कार्यकाळ जुलैमध्ये पूर्ण - उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 11 जागांसाठी 24 मे पासून प्रक्रिया सुरू आहे. या क्रमवारीत सपाकडून 3 जणांनी अर्ज भरले आहेत. राज्यसभेत आतापर्यंत सपाचे एकूण 5 सदस्य आहेत. त्यापैकी विषंभर प्रसाद निषाद, चौधरी सुखराम सिंह आणि कुंवर रेवती रमण सिंह यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात 4 जुलै रोजी पूर्ण होत आहे.

हेही वाचा-MODI Hyderabad Tour: घराणेशाही असणारे पक्षच स्वत:ची तिजोरी भरतात- पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

हेही वाचा-Saint Tyagi Maharaj Video - बद्रीनाथाच्या भेटीची आस; लोटांगण घालत संत त्यागी महाराजांचा ८८५ किलोमीटरचा प्रवास

हेही वाचा-Dr Harshvardhan left ceremony : ...म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन दिल्लीमधील शपथविधी सोहळ्यातून रागाने पडले बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details