रांची - प्रसिद्ध चारा घोटाळ्यासंबंधीत प्रकरणात आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. लालू प्रसाद यांच्यासाठी आजचा दिवस (२२ एप्रिल) अत्यंत महत्त्वाचा ठरला. ( Lalu Prasad Yadav Granted Bail by Jharkhand HC ) लालूप्रसाद यांच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
Lalu Prasad Yadav Bail : लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन - RJD chief Lalu Prasad Yadav granted bail
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. चारा घोटाळासंबंधीत हे प्रकरण आहे. त्यामध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. ( RJD chief Lalu Prasad Yadav granted bail ) आजारपण, वय आणि तुरुंगात राहण्याच्या अडचणी लक्षात घेता आपणास जामीन मिळावा असा अर्ज त्यांच्या मार्फत करण्यात आला होता. त्याला कोर्टाने मान्य करत त्यांना जामीन दिला.
सीबीआयलाही उत्तर सादर करण्यास सांगितले होते - लालू प्रसाद यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत लालू प्रसाद यांनी आजारपण, वय आणि तुरुंगात अर्धी शिक्षा भोगत असल्याचा कारण देत जामीन मागितला होता. यापूर्वी झालेल्या सुनावणीत झारखंड उच्च न्यायालयाने याचिकेतील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच सीबीआयलाही उत्तर सादर करण्यास सांगितले होते.
हेही वाचा -Prashant Kishor : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये? आज हायकमांडशी महत्त्वाची चर्चा