कामरेड्डी - रियागतलापल्ली हे 40 वर्षांपासून एकही पोलीस केस नसलेले आदर्श गाव ( Riyagatlapally ideal village with no police case )आहे. रियागतलापल्ली गावातील एकाही ग्रामस्थाने आजपर्यंत पोलीस ठाण्याची एकही पायरी चढलेली ( Riyagatlapally an ideal village ) नाही. हे कामरेड्डी मेडक जिल्ह्यांच्या सीमेवर भिक्कनूर येथे आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा न्यायाधीश श्रीदेवी यांनी रियागतलापल्लीला ''कायदेशीर कारवाईमुक्त गाव'' म्हणून घोषित ( Riyagatlapally village free from legal action ) केले होते. मंगळवारी तिथल्या प्रतिनिधींना त्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रगती हेच गावाचे ध्येय - 930 लोकसंख्या, 180 कुटुंबांसह, ते सर्व कुटुंबासारखे राहतात. याठिकाणी विविध राजकीय पक्षांचे सदस्य असले तरी ते निवडणुकीच्या वेळीच राजकारण करत नाहित. गावात विकासाचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करत आहेत. आर्थिक स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने भाजीपाला लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित करून ते पुढे जातात. इथे दारूवरून मारामारी होऊ नये म्हणून या उद्देशाने गावातील एक अनधिकृत दारूचे दुकान 12 वर्षांपासून बंद आहे. जर कोणी दारू विकल्यास त्याला पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.