नवी दिल्ली Rishi Sunak visits Akshardham temple : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे जी 20 परिषदेसाठी भारतात आले आहेत. ऋषी सुनक यांनी त्यांच्या कुटुंबीयासह दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. यावेळी ऋषी सुनक यांनी भक्तीभावे मंदिरात पूजा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऋषी सुनक यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिल्यानं परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
सुनक यांनी दिली अक्षरधाम मंदिराला भेट
ऋषी सुनक अक्षरधाम मंदिरात :यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं जी20 परिषदेसाठी भारतात आगमन झालं आहे. ऋषी सुनक हे आपल्या कुटुंबीयांसह भारत भेटीवर आले आहेत. जी20 परिषदेचं पहिलं सत्र पार पडल्यानंतर ऋषी सुनक यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराकडं आपला मोर्चा वळवला. त्यांनी अक्षरधाम मंदिरात मोठ्य़ा भक्तीभावानं पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबीयांनीही अक्षरधाम मंदिरात पूजा केली.
सुनक यांनी दिली अक्षरधाम मंदिराला भेट
भारतात आल्यावर देतात मंदिराला भेट :यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतात आल्यानंतर मंदिराला भेट देणं, यात वेगळं काही नाही. कारण प्रत्येक वेळी भारतात आल्यानंतर ऋषी सुनक हे मंदिराला आवर्जुन भेट देतात. त्यासह मंदिरात गेल्यानंतर ऋषी सुनक हे प्रार्थना करतात. त्यांना हिंदू असल्याचा अभिमान असल्याचं ते सांगतात. त्यामुळे यावेळीही ऋषी सुनक यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात भेट देत पूजा केली. ऋषी सुनक भारतात आल्यानंतर ते विविध मंदिरात दर्शनासाठी जाणं पसंत करतात.
सुनक यांनी दिली अक्षरधाम मंदिराला भेट
जी20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस :जी20 परिषदेत विविध देशातील अनेक मातब्बर नेते सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जी 20 परिषदेचे दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील भारत मंडपम इथं विविध देशातील नेत्यांचं पहिलं सत्र यशस्वी पार पडलं आहे. आज जी20 परिषदेचा दुसरा दिवस आहे.
हेही वाचा :
- Rushi Sunak : ऋषी सुनकसह त्यांच्या पत्नीची इंग्लंडच्या राजाहून अधिक आहे संपत्ती
- G20 Summit : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह भारतात दाखल