महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rishabh Pant Post After Accident : कार अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली सोशल मीडिया पोस्ट, म्हणाला.. - ऋषभ पंतची सोशल मीडिया पोस्ट

भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतचा दिल्लीजवळ डिसेंबर महिन्यात कार अपघात झाला होता. गंभीर जखमी झालेल्या पंतवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर पंतने आज पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. ट्विटरवरून त्याने चाहत्यांने आणि हितचिंतकाचे आभार मानले आहेत.

Rishabh Pant
ऋषभ पंत

By

Published : Jan 16, 2023, 8:38 PM IST

Updated : Jan 16, 2023, 8:48 PM IST

मुंबई : भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सोमवारी ट्विटरवर त्याच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांच्या शुभेच्छांसाठी आभार मानले. तो गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस झालेल्या एका भीषण कार अपघातातून बरा होत आहे. पंतने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, सचिव जय शाह आणि सरकारी अधिकाऱ्यांसह डॉक्टर आणि फिजिओच्या टीमचे आभार मानले, ज्यांनी त्याच्या अपघातानंतर त्याला मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार अपघातानंतर पंतची ही पहिलीच सोशल मीडिया पोस्ट आहे.

ऋषभ पंतचे ट्विट : 'मी सर्वांचे समर्थन आणि शुभेच्छांबद्दल कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली हे तुम्हाला कळवताना मला आनंद होत आहे. माझा परतीचा मार्ग सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे', असे पंत याने ट्विटरवर लिहिले आहे. तुमच्या प्रोत्साहनासाठी मी माझ्या सर्व चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे, डॉक्टरांचे आणि फिजिओचे मनापासून आभार मानू इच्छितो. तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक आहे, असे तो म्हणाला.

वर्षभर टीमच्या बाहेर राहण्याची शक्यता : गेल्या महिन्यात एका भीषण कार अपघातात जखमी झालेला विकेटकीपर पंत 2023 च्या बहुसंख्य कालावधीसाठी टीमबाहेर राहण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, बीसीसीआयला खेळाडूबाबत देण्यात आलेल्या ताज्या वैद्यकीय अपडेटमध्ये असे म्हटले आहे की कार अपघातामुळे पंतच्या गुडघ्यातील तीनही प्रमुख अस्थिबंधन फाटले आहेत. त्यापैकी दोघांची नुकतीच पुनर्बांधणी करण्यात आली आहेत, तर तिसऱ्यावर सहा आठवड्यांनंतर शस्त्रक्रिया अपेक्षित आहे. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, पंत सहा महिन्यांसाठी अ‍ॅक्शन बाहेर असू शकतो ज्याचा अर्थ असा होतो की तो कदाचित आयपीएलमध्येही खेळू शकणार नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

असा झाला अपघात :३० डिसेंबर रोजी पहाटे दिल्लीहून रुडकी येथील घरी जात असताना रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. ते आपल्या बीएमडब्ल्यू कारने दिल्लीहून रुरकी येथील आपल्या घरी परतत होता. त्यावेळी त्याची कार अनियंत्रित होऊन रेलिंगला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. यावेळी त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. नियंत्रण सुटल्यानंतर दुभाजकावर आदळून कारने पेट घेतला होता. सुदैवाने आग लागण्यापूर्वी पंत कारमधून बाहेर आल्याने तो बचावला होता. मात्र त्याचा गुडघ्याला आणि पायाच्या गोट्याला गंभीर दुखापत झाली होती.

हेही वाचा :Rishabh Pant Accident : हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर ठरला देवदूत, अशी केली ऋषभ पंतची मदत

Last Updated : Jan 16, 2023, 8:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details