महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतला वाचवणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा सन्मान, ऐका अपघाताची संपूर्ण कहाणी - rishabh pant

हरियाणा रोडवेजच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा पानिपत डेपोचे जीएम कुलदीप जांगरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (haryana roadways bus driver and conductor awarded). या दोघांनीही शौर्य दाखवून अपघातानंतर ऋषभ पंतचा जीव वाचवण्यात मदत केली होती. (rishabh pant accident).

haryana roadways bus driver and conductor awarded
बस ड्रायव्हर सुशील आणि कंडक्टर परमजीत

By

Published : Dec 30, 2022, 9:25 PM IST

ड्रायव्हर आणि कंडक्टर कडून ऐका अपघाताची कहाणी

पानिपत (हरियाणा) : अपघातानंतर क्रिकेटपटू ऋषभ पंतला वाचवण्यासाठी मदत करणारे हरियाणा रोडवेजचे बस ड्रायव्हर सुशील आणि कंडक्टर परमजीत पानिपत डेपोत कार्यरत आहेत. (haryana roadways bus driver and conductor awarded). दोघांनी ऋषभ पंतला जळत्या कारमधून दूर नेले आणि पोलिसांना माहिती दिली. दोघांनी ऋषभ पंतचे पैसे जमा करून त्याला दिले होते. जेव्हा ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला, त्यावेळी हरियाणा रोडवेज पानिपत डेपोची बस हरिद्वारहून पानिपतच्या दिशेने येत होती. (rishabh pant accident).

ड्रायव्हर आणि कंडक्टरचा सन्मान

डेपोच्या जीएमने केला सत्कार : अपघातानंतर ड्रायव्हर सुशील आणि कंडक्टर परमजीत यांनी रोडवेज बसमधून खाली उतरून ऋषभ पंतला मदत केली. या कामाबद्दल पानिपत डेपोचे जीएम कुलदीप जांगरा यांनी दोघांचाही गौरव केला. ऋषभ पंतच्या बीएमडब्ल्यू कारचा अपघात तो दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी येत असताना झाला. रुरकीच्या नरसन सीमेवर तोल गेल्याने त्यांची कार दुभाजकावर आदळली. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे.

पंतची प्लास्टिक सर्जरी केली जाणार :कारची काच फोडून ऋषभ पंत बाहेर आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर कारमध्ये भीषण आग लागली. यादरम्यान हरियाणा रोडवेजची बस तेथून जात होती. ज्याचा ड्रायव्हर आणि कंडक्टरने ऋषभ पंतला गाडीतून दूर नेले आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. सध्या ऋषभला डेहराडूनला रेफर करण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलिस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचले. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, ऋषभ पंतची प्रकृती सध्या स्थिर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details