नवी दिल्ली -इंधनाच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकारच्या मते जीडीपी (GDP) म्हणजे गॅस (G), डिझेल (D) आणि पेट्रोलच्या (P) किमतीत वाढ, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, की गेल्या सात वर्षांत एका बाजुला नोटाबंदी आणि दुसऱ्या बाजुला रोखीकरण दिसून आले आहे. सुरुवातीला मोदी म्हणाले, की मी नोटाबंदी करणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री रोखीकरण करत असल्याचे सांगतात. शेतकरी, कामगार, लहान दुकानदार, एमएसएमई, पगारी कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांकरिता नोटाबंदी सुरू आहे.
हेही वाचा-ऑर्डर पॅक करायला उशीर झाल्याने डिलिव्हरी बॉयने हॉटेल मालकावर झाडली गोळी
राहुल गांधी म्हणाले, की स्वयंपाक गॅसच्या किमतीत 116 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारने जीडीपी म्हणजे गॅस, सिलिंडर, पेट्रोलने पैसे कमविले आहेत. हे कमविलेले 23 लाख कोटी रुपये कुठे गेले?