राइस मिलची तीन मजली इमारत कोसळली कर्नाल (हरियाणा): कर्नाल जिल्ह्यातील तरवाडी शहरात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे राईस मिलची तीन मजली इमारत पहाटे चारच्या सुमारास कोसळली. हा अपघात झाला तेव्हा राईस मिलचे कामगार इमारतीत झोपले होते. ढिगाऱ्यात जवळपास 30 मजूर अडकल्याचे वृत्त असून, या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २० जण जखमी असल्याची माहिती आहे. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाल्या असून, मजुरांना बाहेर काढण्यात येत आहे.
बचावकार्य सुरु:सकाळपासून मजुरांना वाचवण्याचे काम सुरू आहे. कर्नालचे एसपी शशांक सावन घटनास्थळी हजर आहेत. राईस मिलच्या मालकाची पोलिस चौकशी सुरू आहे. हा अपघात कसा घडला? ही माहिती अद्याप मिळालेली नाही. राईस मिलचे नाव शिवशक्ती असे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून ढिगाऱ्यात दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तरवडी येथील शिवशक्ती राईस मिलमध्ये ही घटना घडली.
१०० हुन अधिक मजूर:या तीन मजली इमारतीत जवळपास 100 मजूर राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले काही मजूर कामावर गेलेले होते, तर काही मजूर हे रात्री इमारतीतच झोपले होते. पहाटे चारच्या सुमारास तीन मजली इमारत अचानक कोसळल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत 18 ते 20 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, तर आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना माहिती मिळताच उच्च अधिकारी आणि कर्नालचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन घटनास्थळी पोहोचले.
येथे आहेत शेकडो राईस मिल्स:3 मजली इमारत कोसळण्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी राईस मिलने बांधलेल्या 3 मजली इमारतीवर तेथील कामगार प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या पोलीस दल आणि बचाव पथक ढिगाऱ्याखालून मजुरांना बाहेर काढण्यात गुंतले आहे. जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हरियाणात सर्वाधिक राईस मिल्स कर्नालच्या तरवाडीत आहेत. येथे शेकडो राईस मिल्स बांधल्या आहेत. या राईस मिलमध्ये लाखो मजूर काम करतात.
हेही वाचा: महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये सरकार पाडण्याच्या प्रयत्नाचा दावा