प्रतिक्रिया देताना नितीश कुमार पाटणा(बिहार) - यूपीए अर्थात 'इंडिया' च्या बंगळुरु येथे झालेल्या बैठकीनंतर नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा होती. यावर आता नितीश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 26 पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चांगले निकाल येतील, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे ते यावेळी म्हणाले.
नितीश कुमार नाराज - बंगळुरू येथे मंगळवारी विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या राजकीय वर्तुळात पसरल्या. मात्र, असे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, सर्व पक्षांमध्ये चांगल्या वातावरणात चर्चा झाली आहे. फालतू बोलणे हे भाजप नेत्यांचे काम आहे, पण त्याने काही फरक पडत नाही.
मला कोणत्याही पदाचा लोभ नाही. मी दिलेल्या सूचनांचा विचार करण्यात आला आहे. मला राजगीरला यायचे होते, त्यामुळे संध्याकाळीच मला पाटण्याला जावे लागले होते. भाजपला सत्तेतून हटवणे हेच माझे ध्येय - नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार
भाजपला सत्तेतून हटवणे हेच ध्येय - मी राजगीरला यायचा विचार करत होतो. सकाळी यायचे होते पण फ्लाईटमुळे संध्याकाळी निघावे लागले. त्यामुळे बंगळुरु येथील पत्रकार परिषदेला हजर राहता आले नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे हे भाजपचे काम आहे. त्यामुळे भाजपवाल्यांबद्दल बोलू नका. मी नाराज नसून, गोंधळून जाऊ नका. सर्व काही एकमताने ठरले आहे. मला कोणत्याही पदाचा लोभ नाही. भाजपला सत्तेवरून हटवणे हेच माझे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Parliament Monsoon Session 2023 : संसदेचे पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरुन वादळी होण्याची शक्यता
- NDA Meeting : NDA च्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारांना पहिल्या रांगेत स्थान, मोदींनी सांगितला NDA चा नवा अर्थ
- INDIA VS NDA : विरोधी आघाडीत मतभेद, तर एनडीएतही कुरबुरी; कोणाचे किती बलाबल?