बारामुल्ला (काश्मीर):काँग्रेसचे माजी नेते Former Congress leader जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad यांनी काश्मीरमधील एका रॅलीत Baramulla rally ghulam nabi azad कलम ३७० Article 370 restoration पुनर्स्थापनेवर मोठे विधान केले आहे. त्यांनी १० दिवसांत त्यांच्या नवीन पक्षाची ghulam nabi azad new party घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. आझाद यांनी रविवारी सांगितले की कलम 370 च्या मुद्द्यावर ते लोकांची दिशाभूल करणार नाहीत. संसदेत केवळ दोन तृतीयांश बहुमत असलेले सरकार ही तरतूद पुनर्स्थापित करू शकते. गेल्या महिन्यात काँग्रेस सोडल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील त्यांच्या पहिल्या रॅलीत आझाद म्हणाले, "मला यांना माहित आहे की, काय केले जाऊ शकते आणि काय केले जाऊ शकत नाही. मी किंवा काँग्रेस पक्ष किंवा तीन प्रादेशिक पक्ष तुम्हाला कलम 370 परत देऊ शकत नाहीत.
10 दिवसांत नविन राजकीय पक्ष - गुलाम नबी आझाद यांनी रविवारी सांगितले की, मी 10 दिवसांत Azad said he will announce a new party in 10 days आपल्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा करणार आहे. या पक्षाची विचारधारा "मुक्त" असेल असे प्रतिपादन त्यांनी केले. नवीन राजकीय पक्षाचा अजेंडा जम्मू आणि काश्मीरचे राज्य पुनर्संचयित करणे, नोकऱ्या, जमिनीच्या हक्कांसाठी माझा पक्ष कायम लढा देईल अशी घोषणा त्यांनी केली. पुढे बोलतांना ते म्हणाले, "माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि माझ्या नवीन पक्षाचा आधार असलेल्या माझ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो.
रोजगार देण्यावर लक्ष -"माझ्या पक्षाचे नाव मी अजून ठरवलेले नाही. जम्मू-काश्मीरचे लोक पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. मी माझ्या पक्षाला एक भारतीय नाव देईन. जे सर्वांना समजेल," असे ते रॅलीत म्हणाले. "माझा पक्ष पूर्ण राज्याचा दर्जा, जमिनीचा अधिकार, मूळ निवासींना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करेल," असे त्यांनी यावेळी सांगितले.