नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आज होत आहे. या बैठकीत, रिझर्व्ह बँक धोरणात्मक निर्णय घेईल, ज्याची घोषणा RBI गव्हर्नर शक्तीकांत दास 5 ऑगस्ट रोजी करतील. ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या बैठकीत आरबीआय रेपो रेट वाढवू शकते. यापूर्वी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतही आरबीआयने रेपो दरात वाढ केली होती. दर दोन महिन्यांनी होणारी चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून सुरू होत आहे.
चलनवाढीचा दर सात टक्क्यांहून अधिक -गेल्या वेळी अशी वाढ झाली होती, तेव्हा किरकोळ चलनवाढीचा दर सात टक्क्यांहून अधिक राहिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास बँका कर्जावरील व्याजदरात वाढ करू शकतात. रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात 0.40 टक्के आणि जूनमध्ये 0.50 टक्के वाढ केली होती. सततच्या वाढीनंतर रेपो दर 4.90 टक्क्यांवर गेला आहे.