नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर येथे रेल्वेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात घडला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेला रेल्वे अपघात अनेकांची झोप उडवणारा आहे. या अपघातात आतापर्यंत 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताचे मदतकार्य पूर्ण झाले आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना वाचविण्यासाठी आणि अपघातग्रस्त रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी खूप वेळपासून बचाव कार्य सुरू होते. हे मदतकार्य पूर्ण झाले असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशातील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी मदतकार्यात मदत करण्यासाठी AIIMS-भुवनेश्वरमधील डॉक्टरांची दोन पथके बालासोर आणि कटक येथे रवाना करण्यात आली आहेत,” असे मांडविया यांनी ट्विटरवर सांगितले. “आम्ही मोलाच जीव वाचवण्यासाठी रेल्वे अपघातातील पीडितांना सर्व आवश्यक मदत आणि वैद्यकीय मदत देत आहोत, असेही ते म्हणाले.
मृतांचा आकडा वाढला : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला. रेल्वे हा अपघात आतापर्यंत झालेल्या अपघातांपेक्षा मोठा अपघात आहे. या अपघातामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान अपघातात मृत झालेल्या प्रवाशांचा आकडा वाढला आहे. मृताचा आकडा वाढून तो 280 च्यावर गेला आहे, तर 900 हून अधिक प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱयाने दिली. तसेच अपघातातील मदत कार्य पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. अपघातील प्रवाशांना वाचवण्यासाठी स्थानिक बचाव पथकांव्यक्तिरिक्त लष्कर आणि हवाई दलानेही मदत घेण्यात आली. जखमींना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले.