हैदराबाद- देशातील इतर राज्यांप्रमाणेच उत्तराखंड राज्यातही यंदाच्या निवडणुकीत घराणेशाही दिसून येत आहे. राजकीय कौटुंबीक वारसा असतानाही पक्षातील कार्यानुसार संधी देणाऱ्या भाजपमध्येही घराणेशाही दिसून येत आहे. याच घराणेशाहीसाठी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काहींनी पक्षांच्या वरिष्ठांची मनधरणी केली तर काहींनी पक्षच बदलले. काहींनी आपल्या अस्तित्वासाठी लाडक्या कार्यकर्त्यांना तिकिट मिळवून देण्यासाठी जोर ( Uttarakhand assembly elections 2022 ) लावला. यामध्ये हरक सिंह रावत व यशपाल आर्य यांसरख्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे. भाजपचे वरिष्ठ नेता भुवन चंद्र खंडूड़ी, विजय बहुगुणा, हरभजन सिंह चीमा यांसह काँग्रेसचे वरिष्ठ नेता हरीश रावत व दिवंगत इंदिरा हृदयेश यांचाही समावेश आहे.
हरक सिंह रावत- राज्यातील राजकारणात दबाव तंत्राचा वापर करणारे बिनधास्त नेते हरक सिंह रावत यांनी यंदा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकत काँग्रेसशी हात मिळवले. मात्र, यंदा हरक सिंह रावत स्वतः निवडणूक न लढवता सून अनुकृती गुसाईं यांना लॅन्सडाउन विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
यशपाल आर्य- सतत चारवेळा आमदारकी मिळवणारे यशपाल आर्य यांनी मागची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, यंदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. यशपाल आर्य हे मुलगा संजीव आर्य यांनाही तिकीट मिळावे यासाठी भाजपकडे मागणी केली. संजीव आर्य हे 2017 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, त्यांना डावलले गेल्याने यशपाल पक्षावर नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. काँग्रेसनेही यशपाल आर्य यांचा मान राखत पिता पुत्राला तिकीट दिले. यशपाल आर्य हे बाजपूर विधानसभा मतदार संघातून तर संजीव आर्य नैनीताल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.