महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Republic of Bharat : संसदेच्या विशेष अधिवेशनात 'इंडिया' नाव बदलणार? काँग्रेसचा जोरदार आक्षेप - इंडिया

मोदी सरकारनं 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनात इंडियाचं नाव बदलून भारत करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Republic of Bharat
Republic of Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 4:52 PM IST

नवी दिल्ली :केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान "इंडिया"चं नाव बदलून "भारत" असा नवीन ठराव आणण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांनी मंगळवारी ईटीव्ही भारतला सांगितलं की, 18 सप्टेंबरच्या विशेष अधिवेशनात ठराव आणण्याचं सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे. राजधानीत दिल्लीत होणारं अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

इंडिया नावावरून नवा वाद : भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला चढवत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दावा केला की, राष्ट्रपती भवनात आयोजित G20 शिखर संमेलनाच्या निमंत्रितांमध्ये 'प्रेसीडेंट ऑफ इंडियाच्या' ऐवजी 'प्रेसीडेंट ऑफ भारत' असं लिहिलेलं आहे. जी-20 शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणाऱ्या रात्रीच्या जेवणासंदर्भात हे निमंत्रण देण्यात आलं आहे. यावर काँग्रेस पक्षानं आक्षेप नोंदवला आहे.

'इंडिया म्हणजेच भारत' :काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, आपल्या राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये लिहिलं आहे की, 'इंडिया म्हणजेच भारत'. आता 'भारत' अस्तित्वात राहणार की नाही? असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केलाय. भाजपा समूह राज्याच्या संकल्पनेवरच हल्ला करत असल्याचा आरोप देखील जयराम रमेश यांनी केला आहे. या प्रकरणी सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रिपब्लिक ऑफ भारत :या संदर्भात आसमाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मानी 'X' या सोशल मीडिया वेबसाईटवर रिपब्लिक ऑफ भारत लिहिलं आहे. 26 विरोधी पक्षांनी 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) नावाची आघाडी संघटना स्थापन केल्यापासून सत्ताधारी भाजपांनं विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळं भाजपा देशाच्या नावात बदल करण्याची शक्यता आरजेडी नेते मनोज झा यांनी वर्तवली आहे.

इंडियाऐवजी भारत शब्द वापरावा :इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा, अशी मागणी भाजपा खासदार हरनाथ सिंह यांनी केली आहे. ते म्हणाले की, ब्रिटिशांनी भारत हा शब्द 'शिव्या' म्हणून वापरला होता, तर भारत आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागल्यास ती करायला हवी, असं ते म्हणाले. भाजपाचे सरचिटणीस तरुण चुग म्हणाले की, जयराम रमेश यांना भारत या शब्दावर आक्षेप का आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं.

भारत या नावावर आक्षेप असू नये : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अनेकदा यावर भाष्य केलंय. इंडियाऐवजी भारत नाव आपण वापरायला हवं, असं त्यांनी अनेक वेळा सांगितलंय. भागवत यांनी म्हटलंय की, भारत नाव प्राचीन काळापासून वापरात आहे. त्यामुळं त्यावर कोणाचाही आक्षेप असू शकत नाही.

संसदेचं विशेष अधिवेशन :मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात या विषयावर विधेयक आणण्याची शक्यता आहे. मोदी सरकारनं 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली आहे. या कालावधीत सरकार कोणती विधेयकं आणणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. खरं तर इंडिया शब्दाचा वाद, ज्या दिवशी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली, तेव्हापासून या नावाला भाजपाचा विरोध आहे. आरजेडी नेते मनोज झा म्हणाले की, इंडिया आघाडीच्या स्थापनेपासूनच भाजपा चिंताग्रस्त आहे. आमच्याकडून इंडिया आघीडीचं नाव कोणीही काढून घेऊ शकत नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. INDIA Meeting : 'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी
  2. Remove INDIA Word : राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हटवण्याची तयारी, सरकार विशेष अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता
  3. Narendra Modi : भारतात भ्रष्टाचार, जातीयवादाला अजिबात थारा नसेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details