महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Republic Day : 26 जानेवारीलाच 'प्रजासत्ताक दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती - 6 जानेवारी 1950 पासून संविधान लागू करण्यात आले

26 जानेवारी 2023 रोजी देशाचा 74 वा 'प्रजासत्ताक दिन' आपण साजरा करणार आहोत. या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? या दिवशी भारताचे राष्ट्रपती तिरंगा का फडकवतात? यामागे काय कारण आहे आणि परंपरा काय आहेत? याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

26 January Republic Day
प्रजासत्ताक दिन

By

Published : Jan 22, 2023, 6:13 PM IST

Updated : Feb 2, 2023, 6:09 PM IST

नवी दिल्ली :देशभरात प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना लागू झाली. हा दिवस खास का आहे? या दिवशी राष्ट्रपती तिरंगा का फडकवतात? २६ जानेवारीचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा का आहे? या दिवसाच्या परंपरा काय आहेत? याशिवाय प्रजासत्ताक दिनाबद्दल अशी 12 मनोरंजक तथ्ये जाणून घेऊया.

1. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले, ते 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले.

2. पहिल्यांदा 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तिरंगा फडकवला होता. यावेळी प्रथमच 21 तोफांची सलामी देण्यात आली होती.

3. प्रजासत्ताक दिनी प्रथमच परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपराही त्याच काळापासून सुरू झाली.

4. स्वातंत्र्य चळवळीपासून ते संविधानाच्या अंमलबजावणीपर्यंत २६ जानेवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. 31 डिसेंबर 1929 रोजी काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर झालेल्या ठरावात भारतासाठी संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. यादरम्यान 26 जानेवारी 2030 पर्यंत भारताला स्वराज्याचा दर्जा न दिल्यास भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केला जाईल, असे सांगण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वी, 26 जानेवारी 2030 रोजी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवला होता. अशाप्रकारे, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिन औपचारिकपणे साजरा केला जात होता.

5. 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव अंमलात आला. या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. त्यानंतर २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

6. 1950 रोजी, देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी 26 जानेवारी रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले.

7. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि त्यांना बंदुकीची सलामी देण्यात आली. यानंतर बंदुकीच्या सलामीची परंपरा सुरू झाली.

8. 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) निमित्त लाल किल्ल्यावर एक समारंभ आयोजित केल्या जातो. ज्यामध्ये पंतप्रधान ध्वजारोहण करतात. दुसरीकडे, 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) निमित्त राजपथ (कर्तव्य पथ) वर एक राष्ट्रीय सोहळा आयोजित केल्या जातो. यावेळी देशाचे घटनात्मक प्रमुख तिरंगा फडकवतात.

9. प्रथमच, प्रजासत्ताक दिनाचा उत्सव 26 जानेवारी 1950 रोजी आयर्विन स्टेडियमवर झाला, ज्याला आता नॅशनल स्टेडियम म्हणून ओळखले जाते.

10. 1950 ते 1954 पर्यंत प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे ठिकाण बदलत राहिले. या दरम्यान अनुक्रमे इर्विन स्टेडियम, राजपथ, लाल किल्ला आणि किंग्सवे कॅम्प येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

11. 1955 साली प्रथमच राजपथावर प्रजासत्ताक दिन परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडने 8 किलोमीटरचे अंतर कापले. रायसीना हिल्स येथून परेडला सुरुवात झाली. इंडिया गेटमधून जाणारा राजपथ लाल किल्ल्यावर संपला.

12. वर्ष 2021 पूर्वी 1.25 लाख लोक प्रजासत्ताक दिनाची परेड पाहत असत. 2021 मधील कोरोना संकटामुळे त्याची संख्या कमी झाली आहे. आता फक्त ४५ हजार लोकांना येण्याची परवानगी आहे.

हेही वाचा : Republic Day Chief Guests : प्रजासत्ताक दिनासाठी कोण असणार प्रमुख पाहुणे? कशी केली जाते निवड? जाणून घ्या A to Z माहिती

Last Updated : Feb 2, 2023, 6:09 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details