श्रीनगर (जम्मू काश्मिर) -महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदार आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काँग्रेस प्रभारी रजनी पाटील यांनी शनिवारी सांगितले की, परिसीमन आयोगाचा अहवाल राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. ( Rjani Patil On Delimitation Commission ) हा आयोग केंद्र करकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. त्या जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी बोलत होत्या.
"जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुकांबद्दल बोलणे ही वेळ नाही. सध्या, आम्ही आमचे स्वतःचे घर व्यवस्थित करण्यात व्यस्त आहोत. आमचे धोरण ठरल्यानंतर आम्ही प्रादेशिक पक्षांशी युती करण्याचा विचार करू असही पाटली म्हणाल्या आहेत. काँग्रेस पक्षातील भांडणाच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की "आम्ही सर्वांना एकाच मंचावर आणण्यात यश मिळाले आहे त्यामुळे मला वाटते की यावर लवकरच तोडगा निघेल. तसेच, त्याचा निकालही आपल्याला लवकरच दिसेल.
डब्ल्यूएचओने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सरकारच्या दाव्यानुसार पाच लाखांच्या तुलनेत 4.7 दशलक्षाहून अधिक मृत्यू झाले आहेत. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी आमचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले होते की कोविड-१९ ची लाटेत सुनामीप्रमाणे पसरत आहे. त्यांच्या या म्हणण्यावर सर्वजण हसले. मात्र, त्यांचे म्हणणे खरे ठरले असही पाटील म्हणाल्या आहेत. “साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील परिस्थिती पाहिल्यास, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक मरण पावले असही पाटील म्हणाल्या आहेत.