महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अबब.. 55 वर्षीय व्यक्तीच्या पोटात आढळला चक्क काचेचा ग्लास - Removed Glass From Person Stomach

मुजफ्फरपूर जिल्ह्यातून चकित करणारी बातमी पुढे आली आहे. येथील एका रुग्णालयात 55 वर्षीय रुग्णाच्या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांना त्याच्या पोटात काचेचा ग्लास आढळला. डॉक्टरांनी काचेचा ग्लास त्या व्यक्तीच्या पोटातून बाहेर काढला आहे.

muzaffarpur patient stomach glass
रुग्णाच्या पोटात ग्लास मुजफ्फरपूर

By

Published : Feb 21, 2022, 8:45 PM IST

Updated : Feb 21, 2022, 9:10 PM IST

पटना (बिहार) -मुजफ्फरपूर जिल्ह्यातून चकित करणारी बातमी पुढे आली आहे. येथील एका रुग्णालयात 55 वर्षीय रुग्णाच्या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांना त्याच्या पोटात काचेचा ग्लास आढळला. डॉक्टरांनी काचेचा ग्लास त्या व्यक्तीच्या पोटातून बाहेर काढला आहे. बद्धकोष्ठता आणि पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार घेऊन रुग्ण रुग्णालयात पोहोचला होता, अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.

हेही वाचा -Lalu Prasad Yadav : जामीन मिळाल्यानंतर लालूंची हत्तीवरुन मिरवणूक, न्यायाधीश म्हणाले...

काचेचा ग्लास रुग्णाच्या पोटात पोहोचला कसा?

रुग्ण हा वैशाली जिल्ह्यातील महुआ भागातील रहिवासी आहे. त्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांचे नेतृत्व करणारे डॉ. महमुदुल हसन यांनी सांगितले की, रुग्णाच्या अल्ट्रासाउंड आणि एक्सरे अहवालातून त्याच्या आतड्यांमध्ये काहीतरी गडबड असल्याचे समजले. काचेचा ग्लास रुग्णाच्या पोटात पोहोचला कसा, हे अद्यापही रहस्य असल्याचे ते म्हणाले.

आतडीची भिंत चिरून ग्लास बाहेर काढला

जेव्हा आम्ही रुग्णाला विचारले तेव्हा, रुग्णाने चहा पिताना ग्लास गिळल्याचा दावा केला. मात्र, हे ठोस कारण नाही. मनुष्याची अन्न नलीका ही असल्या कुण्या वस्तूला प्रवेश देण्यासाठी अरुंद असल्याचे डॉ. महमुदुल यांनी सांगितले. तसेच, सुरुवातील एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे काचेच्या ग्लासला मलाशयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यात यश लाभले नाही. मग ऑपरेशन करावे लागले आणि रुग्णाच्या आतडीची भिंत चिरून ग्लास बाहेर काढवा लागला, अशी माहिती हसन यांनी सांगितले.

रुग्णाची प्रकृती स्थिर

रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यास बरे होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सर्जरी नंतर मलाशयाला दुरुस्त करण्यात आले आहे आणि एक फिस्टुलर ओपनिंग बनवण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून रुग्ण मलत्याग करू शकतो, असे डॉ. हसन यांनी सांगितले.

काही महिन्यांत रुग्ण बरे होण्याची शक्यता

हसन यांच्यानुसार, काही महिन्यांत रुग्ण बरा होण्याची शक्यता आहे, ज्यानंतर आम्ही फिस्टुलाला बंद करू आणि त्याच्या आतड्या या सामान्यपणे काम करू लागतील. ऑपरेशननंतर रुग्ण शुद्धीवर आला, परंतु तो किंवा त्याचे कुटुंबीय मीडियाशी बोलण्यास तयार नव्हते.

हेही वाचा -MLA Keshav Chandra Dance : आमदाराचा नागिन डान्स पाहिलात का?

Last Updated : Feb 21, 2022, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details