महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Astronaut Kalpana Chawla : अंतराळात प्रयोग करणारी भारताची अंतराळ परी कल्पना चावला - Aeronautical Engineering

भारताची अंतराळ परी कल्पना चावला यांनी कोलंबिया अंतराळ यान मोहिमेचे नेतृत्व केले. अंतराळात झेप घेणाऱ्या कल्पना चावला या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. आज त्यांची जयंती, त्यामिनित्त ईटीव्ही भारतने घेतलेला त्यांच्या कार्याचा हा आढावा.

Astronaut Kalpana Chawla
भारताची अंतराळ परी कल्पना चावला

By

Published : Mar 17, 2023, 3:23 PM IST

हैदराबाद : भारताची अंतराळवीर कन्या कल्पना चावला यांनी अमेरिकेतील नासा या संस्थेत संशोधन करुन भारताचे नावलौकिक केले. कल्पना चावला यांचा जन्म हरियाणा येथील कर्नालमध्ये १७ मार्चला झाला होता. कल्पना चावला या अंतराळात झेप घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांनी नासा या जगप्रसिद्ध असलेल्या संशोधन संस्थेत अंतराळविषयक संशोधन केले. नासाने कोलंबिया अंतराळयानाने करण्यात येणाऱ्या संशोधनाच्या प्रमुख पदाची जबाबदारी कल्पना चावला यांच्यावर टाकली त्यातूनच त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती येते.

कल्पना चावला यांचे शिक्षण : कल्पना चावला यांचे प्राथमिक शिक्षण कर्नल टागोर शाळेतून १९७६मध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपली एरोनॉटीक्स विषयातून (Aeronautical Engineering) अभियांत्रिकीची पदवी १९८२ सालात मिळवली. कल्पना चावला या अभ्यासात अतिशय हुशार होत्या. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. कल्पना चावला यांनी १९८४ ला टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटीक्स अभियांत्रिकीमध्ये आपली पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी आपले शिक्षण पुढे चालू ठेवत त्याच विषयात पिएचडीचे शिक्षणही पूर्ण केले.

नासामध्ये केली संशोधनाला सुरुवात :कल्पना चावला यांनी आपली पिएचडी पूर्ण करुन अमेरिकेच्या संशोधन संस्था असलेल्या नासा (National Aeronautics and Space Administration) या संस्थेत संशोधनाला १९८८ पासून सुरूवात केली. त्यांनी नासा या संशोधन संस्थेत फ्ल्युड डायनॅमिक्स या विषयावर आपले संशोधन सुरू केले. अंतराळात त्यांना संशोधनाची विशेष रुची होती. त्यामुळे त्यांनी आपले अंतराळाबाबतचे संशोधन सुरूच ठेवले.

ओवरसेट मेथड्स कंपनीच्या उपप्रमुख :कल्पना चावला यांनी आपले संशोधन सुरू केल्यानंतर त्यांनी अमेरिकन असलेल्या ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतले. या ठिकाणी कल्पना चावला यांनी एरोडानामिक्समध्ये खूप महत्वाचे संशोधन केले. त्यामुळे त्यांनी सादर केलेले रिसर्च पेपर चांगलेच चर्चेत राहत होते. त्यामुळे कल्पना चावला यांनी अंतराळ संशोधनातून अल्पावधीतच चांगले नाव कमावले. त्यामुळेच नासाने संभाव्य अंतराळविरांच्या १९९४ च्या यादीत कल्पना चावला यांच्या नावाची नोंद घेतली. तर १९९५ ला जॉन्सन एरोनॉटीक्स सेंटरमधील प्रशिक्षणात त्यांचा समावेश करण्यात आला. या प्रशिक्षणानंतर कल्पना चावला यांना अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचे कामही देण्यात आले.

तब्बल ३७६ तास ३४ मिनीटे पृथ्वीला मारल्या २५२ फेऱ्या :नासाने १९९६ मध्ये अंतराळात संशोधनासाठी काही अंतराळविरांना मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. या एटीएस ८७ या मिशनच्या संशोधनाच्या मोहिमेचे नेतृत्व कल्पना चावला यांच्याकडे सोपवले. त्यामुळे भारताचा मानात मानाचा तुरा खोवला गेला. कल्पना चावला यांच्या नेतृत्त्वात १९ नोव्हेंबर १९९७ ला नासाच्या अंतराळविरांनी अंतराळ मोहिमेवर जाण्याचा श्रीगणेशा केला. कल्पना चावला या पथकाने तब्बल ३७६ तास ३४ मिनीटे पृथ्वीला २५२ फेऱ्या मारल्या. यावेळी या पथकाने 1 कोटी 46 हजार किमीचा प्रवास केला.

यशस्वी मोहिमेचा करुन अंत :नासाने अंतराळात संशोधनाची मोहीम आखल्यानंतर कल्पना चावला यांची प्रमुख म्हणून निवड केली. त्यांच्या नेतृत्वात कोलंबिया यानातून ही मोहीम यशस्वीही झाली. या मोहिमेवरुन कल्पना चावला यांच्यासह त्यांचे पथक परत येत होते. कल्पना चावला यांचे कोलंबिया यान एक फेब्रुवारी २००३ ला पृथ्वीकडे झेपावले होते. हे यान अमेरिकेच्या पॅसिफिक समुद्रात उतरणार होते. त्यासाठी सगळ्यांनाच या अंतराळविरांच्या आगमनाची उत्सुकताही लागली होती. मात्र काही अचानक कोलंबिया यानाचा संपर्क तुटला अन् होत्याचे नव्हते झाले. भारतीय अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह त्यांच्या साथिदारांनी या जगाचा निरोप घेतल्याचे स्पष्ट झाले. भारतीय अंतराळ परी कल्पना चावला यांचे असे अचानक जाणे करोडो भारतीयांना चटका लाऊन गेले. आज कल्पना चावला यांचा जन्मदिवस त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतचे विनम्र अभिवादन

हेही वाचा - Papmochani Ekadashi 2023: पापमोचनी एकादशीच्या दिवशी करावी भगवान विष्णूंची पूजा, टाळाव्या 'या' गोष्टी

ABOUT THE AUTHOR

...view details