भोपाळ(मध्य प्रदेश) - आता मुस्लिम कर्मचाऱ्यांना मैहरच्या शारदा देवी मंदिरात कामाला ठेवले जाणार नाही. याबाबत धर्मसेवा विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या मंदिर प्रशासनाला पाठवलेल्या सूचनांमध्ये शारदा देवी मंदिर परिसरातून मांस व दारूची दुकाने हटवण्याबरोबरच मंदिराच्या व्यवस्थापन समितीतून मुस्लिम कर्मचाऱ्यांना तत्काळ हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सूचनेचा फटका मंदिरातील दोन कर्मचाऱ्यांना बसणार आहे, हे दोन्ही कर्मचारी ३५ वर्षांपासून मंदिर व्यवस्थापनाचा भाग आहेत.
काय आहे प्रकरण -.मैहर मंदिर परिसरातून मांस आणि दारुचे दुकाने हटवण्यात यावेत. तसेच मुस्लिम कर्मचाऱ्यांना मैहर शारदा मंदिरातून कामावरून काढण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मंदिर परिसरातून मांस, दारूचे दुकाने हटवण्यात येणार आहेत. तसेच मंदिर व्यवस्थापन समितीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर मैहरच्या मंदिराच्या व्यवस्थापन समितीत 35 वर्षांपासून कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आबिद हुसेन हे मंदिरात कायदेशीर सल्लागार म्हणून तर अयुब हे येथील पाण्याची व्यवस्था बघणारे कर्मचारी आहेत. या दोघांनाही या आदेशाचा फटका बसणार आहे.
काय लिहिले आहे पत्रात : सतना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वीही या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र अहवाल देण्यात आलेला नाही. मंत्र्यांनी पत्रात दिलेल्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही करून तीन दिवसांत अहवाल उपलब्ध करून द्यावा, असे पत्रात म्हटले आहे. मंत्र्यांना दिलेले हे पत्र उपसचिव पुष्पा कुलेश यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर व्यवस्थापन समितीला हे पत्र मिळाले आहे.
मुस्लिम कर्मचाऱ्यांना का काढले जात आहे : मंदिरातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरुन का काढले जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम कर्मचाऱ्यांना मंदिरातून काढून टाकावे, अशी मागणी मैहरच्या हिंदू संघटनांनी मंत्री उषा ठाकूर यांच्याकडे केली होती. हिंदू संघटनांच्या मागणीवरून सरकारचे निर्देश पत्र धार्मिक न्यायमंत्र्यांच्या हवाल्याने जारी करण्यात आले आहे. एखाद्याला त्याच्या जातीच्या आधारावर नोकरीवरून काढून टाकणे घटनात्मक आधारावर योग्य ठरेल का? हा प्रश्न आता विचारला जात आहे.
हेही वाचा -Baljeet Kaur Alive : गिर्यारोहक बलजीत कौर सुखरुप; काठमांडू येथे उपचार सुरु, निधनाची बातमी झाली होती व्हायरल