महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#jiodown : जिओचे नेटवर्क डाऊन! वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर जिओने दिले हे स्पष्टीकरण - reliance jio network down

फेसबूक, व्हाटसअॅपनंतर आता जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याच्या तक्रारी विविध युझर्स करत आहेत. जिओचे नेटवर्क काम करत नसल्याच्या तक्रारी अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावरून केल्या आहेत. तर जिओने वापरकर्त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमा मागत लवकरच ही समस्या लवकरच सोडविली जाईल असे म्हटले आहे.

जिओचे नेटवर्क डाऊन! वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर जिओने दिले हे स्पष्टीकरण
जिओचे नेटवर्क डाऊन! वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर जिओने दिले हे स्पष्टीकरण

By

Published : Oct 6, 2021, 1:36 PM IST

नवी दिल्ली : फेसबूक, व्हाटसअॅपनंतर आता जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याच्या तक्रारी विविध युझर्स करत आहेत. जिओचे नेटवर्क काम करत नसल्याच्या तक्रारी अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावरून केल्या आहेत. तर जिओने वापरकर्त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमा मागत लवकरच ही समस्या लवकरच सोडविली जाईल असे म्हटले आहे.

#jiodown हॅशटॅग ट्रेंडिंग

जिओच्या नेटवर्कमध्ये समस्या असल्याच्या अनेक तक्रारी युझर्सनी ट्विटरवरून केल्या आहेत. #jiodown हा हॅशटॅग वापरून वापरकर्त्यांनी याविषयीच्या तक्रारी केल्या आहेत. जिओचे नेटवर्क काम करत नसल्याचे युझर्सनी म्हटले आहे.

जिओचे स्पष्टीकरण

जिओने यावर एक स्पष्टीकरण जारी केले आहे. "जिओला नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी युझर्सनी ट्विटरवर केल्या आहेत. देशाच्या विविध भागातील जिओ वापरकर्त्यांनी याची तक्रार केली आहे. आमच्याकडून यावर प्रतिसाद दिला जात आहे. वापरकर्त्यांना होणऱ्या त्रासाविषयी आम्ही क्षमस्व आहोत. ही एक तात्पुरती समस्या आहे आणि आमची टीम ती सोडविण्यासाठी काम करत आहे. लवकरच सेवा पूर्ववत होईल" असे ट्विट जिओकेअरकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा -जिओचा डाटा संपल्यानंतरही मिळू शकते सेवा; 'हा' निवडा पर्याय

ABOUT THE AUTHOR

...view details