नवी दिल्ली :रिलायन्स जिओने दिल्लीतील 5G नेटवर्कवर सुमारे 600 Mbps ची सरासरी डाउनलोड गती नोंदवली ( 5g techonoly ) आहे. मंगळवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली. ओकलाच्या 'स्पीडटेस्ट इंटेलिजन्स' अहवालानुसार, दूरसंचार ऑपरेटर त्यांच्या नेटवर्कची चाचणी घेत ( ookla speedtest intelligence reportv )आहेत. त्यांना 5G डाउनलोड गतीची ( 5G Speedtest ) विस्तृत श्रेणी आढळली आहे. कमी दुहेरी अंकांपासून (16.27 Mbps) ते तीन अंकी स्पीड 809.94 Mbps पर्यंत इंटरनेटचीगती पाहिली गेली आहे.
व्यावसायिक टप्प्यात प्रवेश :अहवालात नमूद करण्यात आले आहे की "हा डेटा या वस्तुस्थितीकडे निर्देश करतो की ऑपरेटर अजूनही त्यांचे नेटवर्क संबंधीत आमखी माहिती प्राप्त करत आहेत. हे नेटवर्क व्यावसायिक टप्प्यात प्रवेश करत असल्याने वेग अधिक स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. ओकलाने चार शहरांमधील सरासरी 5G डाउनलोड गतीची तुलना केली. जेथे Jio आणि Airtel या दोघांनी त्यांचे नेटवर्क तयार केले आहे. दिल्लीत, Airtel ने 197.98 Mbps वर सुमारे 200 Mbps सरासरी डाउनलोड स्पीड ( Airtel download speed test ) गाठला. तर Jio ने सुमारे 600 Mbps (598.58 Mbps) स्पीड नोंदवला. Jio दसऱ्यापासून चार शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार ( Reliance Jio download speed test ) आहे.