कोलकाताBengal Global Business Summit :रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व दूरदर्शी नेतृत्व असल्याचं सांगत प्रशंसा केली. मुकेश अंबानी म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये गुंतवणुकीसाठी आदर्श वातावरण आहे. त्यामुळं आमच्यासाठी बंगाल हे आणखी एक महत्त्वाचे गुंतवणुकीचे ठिकाण आहे.
रिलायन्सकडून येत्या तीन वर्षात शिक्षण, आरोग्यसेवा आणि कृषी क्षेत्रांचे डिजिटलायझेशन यावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये जिओची दूरसंचार सेवा वाढविणे आणि जैविक उर्जा उत्पादनाला चालना देण्यावर रिलायन्स लक्ष केंद्रित करणार आहे. वाजपेयी यांनी तुमची फायरब्रँड म्हणून वर्णन केलं होतं, अशी आठवणही मुकेश अंबानी यांनी यावेळी करून दिली. कालीघाट मंदिराच्या जीर्णोद्धार, रिलायन्स मार्टमधून बंगालच्या हस्तकलेला प्रोत्साहन आणि हातमाग क्षेत्राच्या अधिक विकासासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार असल्याचंही यावेळी मुकेश अंबानी यांनी घोषणा केली.
राज्य नवीन गुंतवणुकीसाठी योग्य असल्याचं सिद्ध-आम्ही पश्चिम बंगालमध्ये आधीच ४५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुढील तीन वर्षांसाठी राज्यात 20,000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक होणार आहोत, असे अंबानी यांनी म्हटले. गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगालमध्ये जीडीपीची वाढ झाली आहे. त्यामधून हे राज्य नवीन गुंतवणुकीसाठी किती योग्य आहे हे सिद्ध झाल्याचा दाखलाही उद्योगपती अंबानी यांनी दिला.
विविध उद्योगपतींकडून गुंतवणुकीची तयारी-नारायण समूहाचे देवीप्रसाद शेट्टी यांच्यासह इतर उद्योगपतींनी येत्या दोन वर्षांत कोलकाता येथे आधुनिक रुग्णालय स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे. जेक ग्रुपचे हर्ष निओटिया यांनी डेअरी क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं. या प्रकल्पातून सुमारे 2,000 लोकांना रोजगार मिळेल, असा अंदाज आहे. विप्रोचे ऋषद प्रेमजी यांनी बंगालमधील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वचनबद्धता व्यक्त केली. राजारहाटमध्ये देशातील सर्वात मोठा कॅम्पस तयार करण्यात येणार असल्याचं प्रेमजी यांनी यावेळी सांगितलं. विविध बड्या उद्योगपतींनी पश्चिम बंगालच्या आर्थिक विकासासाठी गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिल्यानं जागतिक बंगाली व्यवसाय शिखर परिषद फलदायी ठरल्याचं दिसत आहे.
हेही वाचा-
- Death Threat To Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या जीवाला खरंच धोका आहे का? 2021 पासून आजतागायत किती वेळा आल्या धमक्या?
- Mamata Banerjee News : राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ममता बॅनर्जी निर्दोष
- Mukesh Ambani Threat Case : क्रिकेटर शादाब खानच्या नावानं मुकेश अंबानींना धमकी, आरोपीला क्रिकेटच्या मैदानावर सुचली कल्पना