महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NABARD Recruitment 2023 : नाबार्डमध्ये कंत्राटी पध्दतीने भरती, 26 जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख - Recruitment in NABARD on contract basis

नाबार्डची उपकंपनी असलेल्या नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे. या पदासाठी 1.25 लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी लिंक या बातमीत दिली आहे ती पाहा.

NABARD Recruitment 2023
नाबार्डमध्ये कंत्राटी पध्दतीने भरती

By

Published : Jan 18, 2023, 3:50 PM IST

Updated : Jan 25, 2023, 1:35 PM IST

नाबार्डची उपकंपनी असलेल्या नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) मध्ये विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने सल्लागाराच्या पदांसाठी नाबार्ड भरती 2023 ची जाहिरात जारी करण्यात आली आहे. कंपनीने सक्रिय केलेल्या वेगळ्या लिंकद्वारे उमेदवार अर्ज करू शकतात.

विविध पदांसाठी भरती : नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटची पूर्ण मालकीची उपकंपनी नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने विविध क्षेत्रातील सल्लागार पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने 17 जानेवारी 2023 मंगळवार रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, सल्लागार, सल्लागार - स्थापत्य अभियंता, सल्लागार - कौशल्य, सल्लागार - सांख्यिकी आणि डेटा विश्लेषण, सहयोगी सल्लागार - व्यवसाय विकास आणि सहयोगी सल्लागार - फूड प्रोसेसिंग आणि स्टोरेज या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 1.25 लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. ही पदे कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहेत.

कंत्राट संदर्भात संपूर्ण माहिती :उमेदवारांनी नोंद घ्यावी की नाबार्डच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसद्वारे जाहिरात केलेल्या सल्लागार पदांसाठीची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल. कराराचा कालावधी सुरुवातीला एक वर्षासाठी असेल आणि कंपनीच्या धोरणांनुसार उमेदवाराच्या कामगिरीच्या वार्षिक पुनरावलोकनाच्या आधारे, जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीसाठी वर्ष ते वर्ष वाढवता येईल. मात्र, हा करार तीन महिन्यांची नोटीस देऊन संपुष्टात येऊ शकतो. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच, नियुक्तीनंतर, उमेदवारांना जास्तीत जास्त 1.25 लाख रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

अंतिम तारीख :नाबार्डच्या नॅबकॉन्सद्वारे जाहिरात केलेल्या सल्लागाराच्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, nabcons.com, करिअर विभागात, सक्रिय लिंकवरून किंवा थेट साईटवरून भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. पदांनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक या भरतीच्या जाहिरातीतच देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2023 आहे.

हेही वाचा : CA Bhavya Paleja : आई वडिलांच्या खांद्यावर बसून शिक्षण पूर्ण करणाऱ्या, भव्य पलेजाने उत्तीर्ण केली 'सीए' ची परीक्षा

Last Updated : Jan 25, 2023, 1:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details