महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कळणगुटचे आमदार मायकल लोबो यांची बंडखोरी - Rebellion of Kalangut MLA Michael Lobo

कळणगुटचे आमदार आणि मंत्री सध्या बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट न मिळाल्यास ते काँग्रेससोबत जाऊन निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते आहे. शिवोली हा भाजपचे माजी मंत्री दयानंद मान्द्रेकार यांचा मतदारसंघ, मात्र 2017 गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर यांनी पराभव केला. मात्र, मान्द्रेकर (2022)ला पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

गोव्यातील कळणगुटचे आमदार मायकल लोबो यांची बंडखोरी
गोव्यातील कळणगुटचे आमदार मायकल लोबो यांची बंडखोरी

By

Published : Nov 10, 2021, 12:46 PM IST

सिंधुदुर्ग - कळणगुटचे आमदार आणि मंत्री सध्या बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट न मिळाल्यास ते काँग्रेससोबत जाऊन निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते आहे. शिवोली हा भाजपचे माजी मंत्री दयानंद मान्द्रेकार यांचा मतदारसंघ, मात्र 2017 गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर यांनी पराभव केला. मात्र, मान्द्रेकर (2022)ला पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, त्यापूर्वीच लोबो यांनी आपल्या पत्नीसाठी येथे हातपाय पासरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भाजपने यास थोडा विरोधही दर्शवला. त्यामुळे नाराज असलेले लोबो सध्या काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत.

आमदार मायकल लोबो

लोबो आणि काँग्रेस उमेदवार एकाच

कळणगुट तसेच बारदेश तालुक्यावर मंत्री मायकल लोबो यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या तालुक्यातील सर्वच आमदार त्यांचे समर्थक आहेत. सोबत त्यांचे काँग्रेस पक्षाशी चांगलेच संबंध आहेत. त्यामुळे मंगळवारी एका सामाजिक कार्यक्रमात लोबो काँग्रेस पक्षाचे म्हापसा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुधीर कांडोळकर यांच्यासोबत सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी जनतेची मागणी असेल तर आपणा स्वतः ला, पत्नी डिलियाना लोबो व सुधीर कांडोळकर यांना जनता निवडून देईल असे विधान करत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार यावर भाष्य करणे टाळले.

लोबो यांनी नुकतीच दिल्लीत घेतली होती पक्षश्रेष्ठींची भेट

राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस नुकतेच गोव्यात येऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी सर्वच नाराज आमदारांची भेट घेतली होती. मात्र, काही आमदारांची नाराजी दूर करण्यात फडणवीस अयशस्वी ठरले होते. त्यामुळे याच आमदारांनी आपल्या पत्नी व सहकार्यांना तिकीट न मिळाल्यास पक्षाबाहेरचा रस्ता धरण्याचा अप्रत्यक्ष संदेशही दिला होता. त्यातच लोबो यांनी ऐन दिवाळीत दिल्लीत जाऊन भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र, या भेटीत काहीही निष्पन्न झाले नसल्याचे बोलले जातय. त्यामुळेच आमदार लोबो यांनी आता स्वतंत्रपणे प्रचारास सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details