महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Eknath Shinde on Floor Test : आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही - एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाच्या राजकीय ( Rebel Shivsena Leader Eknath Shinde ) हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यातील सत्ता स्थापनेला वेग आला असून, घडामोडी फार वेगाने होताना दिसत आहेत.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

By

Published : Jun 29, 2022, 1:46 PM IST

Updated : Jun 29, 2022, 3:57 PM IST

गुवाहाटी-आम्ही उद्या मुंबईत पोहोचू. 50 आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही. आम्ही सर्व गोष्टींमध्ये पास होऊ. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. आमच्याकडे बहुमत आहे, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे म्हणाले, की सर्व आमदारांनी आनंदाने दर्शन घेतले. कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने आणललेले नाही. आमच्याकडे ५४ आमदार आहेत. छत्रपती शिवराय आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करणार आहे. बहुमत चाचणीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करणार आहोत. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर यांच्या विचारांना पुढे नेणारी शिवसेना आहे.

महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाच्या राजकीय ( Rebel Shivsena Leader Eknath Shinde ) हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यातील सत्ता स्थापनेला वेग आला असून, घडामोडी फार वेगाने होताना दिसत आहेत. मंगळवारी ( 28 जून ) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस व भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज ( 29 जून ) राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं ( bhagatsingh koshyari sent letter cm uddhav thackeray ) आहे.

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सरकार न्यायालयात-भाजपच्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor bhagat singh koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्याच विश्वासदर्शक चाचणीला ( MVA Government Floor Test ) सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ( MVA Govt In SC ) आहे. संध्याकाळी 5 वाजता याचिकेवर सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ( Congress Leader Prithviraj Chavan ) म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार उद्याच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मात्र याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात-एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल असून, त्यांच्याकडे बहुमत नाही, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. यासाठी भाजप शिष्टमंडळांनं देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली काल ( 28 जून ) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी सध्या राज्यातील परिस्थिती त्यांना सांगत महाविकास आघाडी सरकारकडे आता बहुमत नसून ते अल्पमतात आलं असल्याकारणाने तुम्ही बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली होती. त्याअनुषंगाने आज ( 29 जून ) राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, या बहुमत चाचणीसाठी कुठली तारीख दिली आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे.

हेही वाचा-MVA Govt In SC : राज्यपालांच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात, 5 वाजता सुनावणी

हेही वाचा-Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदार गोव्याच्या वाटेवर; ताज हॉटेलबाहेर वाढला पोलीस बंदोबस्त

हेही वाचा-Atul Londhe : राज्यपाल या संस्थेचा असंवैधानिक दुरुपयोग - अतुल लोंढे

Last Updated : Jun 29, 2022, 3:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details