गुवाहाटी/मुंबई - शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील ( Rebel MLA ShahajiBapu Patil ) यांनी विचारलेल्या एका वाक्याचे राज्यभरात विविध मिम्स आणि विनोद तयार झाले होते. शिंदे यांनी बापूना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. तश्याच टोनमध्ये शहाजीबापूंनी सर्वांसमोर ते वाक्य त्यांनी उच्चारले.
महाराष्ट्रात सध्या प्रसार माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर 'काय झाडी काय डोंगर काय हॉटेल' हे वाक्य व्हायरल होताना दिसत आहे. शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. अशात महराष्ट्रापासून दूर असले तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदार महोदयांना या वाक्याची भुरळ पडली नसती तरच नवल होते.
एकनाथ शिंदेंनी केली विनंती -यावेळी शिंदे यांनी बापूना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. तसेच हे वाक्य किती व्हायरल झाल आहे आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हेही देखील दाखवून दिलं आहे.
शहाजीबापूंना पुन्हा शिंदेंनी म्हणायला लावला डायलॉग शहाजीबापूंच शिंदेंनी केले कौतुक - हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये 48 बंडखोर आमदार आहेत. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंच त्यांनी मनापासून कौतुक केले. यावेळी शिंदे यांनी बापूना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली, तसेच हे वाक्य किती व्हायरल झालय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हे देखील दाखवून दिले. यावेळी शहाजी बापू यांनी सर्व आमदारांसमोर हे वाक्य त्याच लईत म्हटले आणि सगळ्यांनी मिळून त्याचा आनंद घेतला.
आमदारांमध्ये पिकला हशा -शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याबरोबर बोलताना त्यांनी गुवाहाटीचा केलेल्या वर्णन आणि त्यांनी सांगितलेला आपला राजकीय प्रवास याची चर्चाही सोशल मीडियावर जोरदारपणे झाली आहे. तर यावेळी मात्र त्यांच्या या व्हिडीओची भूरळ थेट एकनाथ शिंदे यांनाच पडलेली दिसते. त्यांनी शहाजीबापू यांना सर्वांसमोर तो डायलॉग म्हणायला सांगितले. शहाजीबापू यांनीही एकदम नॅचरल स्टाईलमध्ये तो डायलॉग म्हटला आणि सर्व आमदारांमध्ये हशा पिकला.
हेही वाचा -What Is Floor Test : फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? सगळी उत्तरे मिळतील... पाहा Video