कोलकाता :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनरर्जी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश यांची भेट घेतली. भेटीपूर्वी भाजपाला एकजुटीने हे विरोध करणार की नाही अशी अटकळ चर्चेत होती. मात्र त्यांनी सर्व गोष्टी फेटाळून लावल्या. त्यांनी एकजुटीने विरोध करण्याचा संदेश दिला. भगवा ब्रिगेडच्या लोकांसाठी, ममता म्हणाल्या की आपल्या काही गोष्टी बाजूला ठेवून भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास तयार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास राज्य सचिवालय नबन्ना येथे आले. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव नितीश कुमार यांच्यासोबत ममतांच्याबरोबर बैठकीला उपस्थित होते. बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी नबन्ना गेटवर नितीश आणि तेजस्वी यांचे स्वागत केले. त्यानंतर दोघांनी ३० मिनिटांहून अधिक वेळ संवाद साधला. बैठकीनंतर नितीश कुमार ममता बॅनर्जी आणि तेजस्वी यादव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
आगामी 2024 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी शक्तींना एकत्र करणे महत्त्वाचे आहे, असे नितीश कुमार यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचे ममता बॅनर्जी यांनी स्वागत केले. मी यापूर्वीही असेच म्हटले आहे, असे ममतांनी स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेस काही बाबी सोडून भाजपचा पराभव करण्यासाठी एका मंचावर येण्यास तयार आहे, असे ममता म्हणाल्या. बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, चांगली चर्चा झाली. आम्हाला खात्री होती की भविष्यात आम्ही एकत्र येणार आणि निवडणुकीली एकत्रच सामोरे जाणार. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी मिळून तयारी करावी यावर आज आम्ही चर्चा केली. सर्वांनी एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ. आम्ही जे काही पाऊल उचलणार ते देशाच्या भल्यासाठीच उचलणार, असे नितीश कुमार पत्रकारांना म्हणाले.
नितीश कुमार यांनी बंगालच्या विकासाचे यावेळी कौतुक केले. बंगालमध्ये सर्व काही किती सुधारले आहे ते मी पाहतो आहे. जे सत्तेत केंद्रात आहेत, त्यांचा देशातील जनतेशी संपर्क नाही, त्यांना देशाच्या हिताची काळजी नाही, ते फक्त स्वतःचा प्रचार करत आहेत. कोणतेही काम होत नाही. देशाच्या प्रगतीसाठी काही केले नाही. असे नितीश कुमार यांनी केंद्रावर ताशेरे ओढले. हा एकत्रित लढा का आवश्यक आहे हेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. म्हणूनच आम्ही सर्वांशी बोलत आहोत. त्यामुळेच एकत्र लढण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - YS Sharmila Slaps SI : वायएस शर्मिला यांनी पोलिसाला लावली थप्पड, लेडी कॉन्स्टेबलला मारला धक्का, पोलिसांनी केली अटक