महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा आजच्या महत्त्वाच्या बातम्या

नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त ( Savitribai Phule Jayanti ) नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात आज राज्यात ठिकठिकाणी आंदोने करण्यात येणार आहेत. भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन ( Inauguration of Indian Science Congress ) आज नागपुरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today In Marathi )

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या बातम्या

By

Published : Jan 3, 2023, 7:05 AM IST

Updated : Jan 3, 2023, 7:10 AM IST

मुंबई : भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन :भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन आज नागपुरात होणार ( Inauguration of Indian Science Congress ) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री नरेंद्र सिंह ( Union Science and Technology Minister Narendra Singh ) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण तसेच सतत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान असे यंदाच्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा विषय आहे.

  • सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम :नायगाव खंडाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त ( Savitribai Phule Jayanti ) नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे आठ वाजता दिंडीला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आयोजित सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) शंभुराज देसाई, अतुल सावे उपस्थिती लावणार आहेत.
  • अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्याकृषी प्रदर्शनाचे उद्घाटन :अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्याकृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन होणार आहे. 3 ते 18 तारखेपर्यंत नवउद्योजकांसाठी (स्टार्ट अप) या प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले. कृषि प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी 19 ते 23 जानेवारी दरम्यान खुले असणार आहे. 170 एकरावरती याचे आयोजन करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर रणवीर चंद्रा व डॉक्टर अजित जावकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार उपस्थित राहतील. ( Inauguration of Agriculture Development Agricultural Exhibition )
  • निवासी डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस : (Second day of resident doctors strike ) मार्ड निवासी डॉक्टरांचा संप सुरूच राहणार आहे. पंधरा दिवसात निवासी डॉक्टरांच्या मागण्याबाबत सकारात्मक पाऊलं उचलली जातील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलेला असताना सुद्धा मार्ड निवासी डॉक्टरांचा संप सुरूच आहे. राज्यभरातील 7 हजार डॉक्टर या संपात सहभागी आहेत.
  • अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन : (Anganwadi workers strike ) अंगणवाडी सेविकांचे आज आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन होणार आहे. सावित्रीबाईंचा मुखवटा घालून धरणे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा मुखवटा धारण करून मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे आंदोलन केले जाणार आहे.
  • चेंबूर येथे भव्य मोर्चा :मुंबई मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पांजरपोळ चेंबूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • रत्नागिरीत अजित पवारांविरोधात आंदोलन : (Protest against Ajit Pawar in Ratnagiri ) छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवार यांनी केलेल्या विधानाविरोधात भाजपकडून संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. याच कसब्यामध्ये छत्रपती संभाजी राजे यांना मुघलांचा सरदार मुकर्रबखान याने धोक्याने कैद केले होते. त्यामुळे भाजपच्या या आंदोलनाला महत्व असेल.
  • अजित पवारांच्या विरोधात आंदोलन : (Agitation against Ajit Pawar )विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विरोधात आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन करण्यात येणार आहे.
  • सीएम सुखविंदर यांचे आज धर्मशाळेत स्वागत : सीएम सुखविंदर सिंग ( CM Sukhwinder Singh ) यांचे आज धर्मशाळेत जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. सीएम सुखविंदर सिंग सकाळी दिल्लीहून धर्मशाळेत पोहोचतील.
  • भाजप आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज बैठक : हिमाचल भाजप आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज धर्मशाळा येथे होणार आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होणार आहे.
  • राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा :भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा ( Bharat Jodo Yatra second leg ) ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. काँग्रेस पक्षाने याबाबतचा मार्ग नकाशा जारी केला आहे. हा प्रवास दिल्लीच्या लोणी सीमेवरून सुरू होईल. जी दिल्लीहून श्रीनगरच्या लाल चौकापर्यंत जाईल.
  • इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी स्वॅपिंग बैठक : केंद्र सरकारने दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी स्वॅपिंगसाठी 3 जानेवारी 2023 रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत, भारतीय मानक ब्युरोद्वारे मानकांवर चर्चा केली जाईल. यामध्ये ते ऐच्छिक किंवा अनिवार्य करण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चाही केली जाणार आहे. सरकारचा विश्वास आहे की नवीन मानके एकसमान आहेत आणि बॅटरी स्वॅपिंग सुलभ करेल.
  • Poco C50 भारतात लॉन्च होईल :आज Poco भारतात Poco C50 फोन लॉन्च करू शकतो. 91 Mobiles च्या रिपोर्टनुसार, बजेट स्मार्टफोन 3 जानेवारीला देशात लॉन्च होण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये 6,000 mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. यापूर्वी Poco C50 भारतात नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार असल्याची अफवा होती, परंतु तो बाजारात सादर करण्यात आला नव्हता.
Last Updated : Jan 3, 2023, 7:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details