मुंबई : शरद पवारांचा आज इंदापूर दौरा (Sharad Pawar Indapur visit) : आज राष्ट्रवादीचे अध्यक्षशरद पवार इंदापूर दौऱ्यावर आहेत. ते आज सकाळी 10.15 वाजता दत्तात्रय भरणे यांच्यासोबत आधुनिक द्राक्ष बागेची पाहणी करणार आहेत.
19 बंगले घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या करणार एफआयआर दाखल (Kirit Somaiya on 19 bungalow scam case):आज सकाळी 11.30 वाजता ठाकरे सरकारच्या 19 बंगले घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करणार आहेत.
हिंदू समाजाकडून लव्ह जिहादच्या विरोधी मोर्चा (Hindu community march against Love Jihad):आज सकाळी 10 वाजताकोल्हापूर- सकल हिंदू समाजाकडून लव्ह जिहादच्या विरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे.
आज सिल्लोडला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्याची उपस्थिती ( inauguration of State Level Agriculture Festival by CM in Sillod) : आज सिल्लोडला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन आहे. औरंगाबादमध्ये सिल्लोडला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री भागवत कराड दुपारी 2 वाजता उपस्थित राहणार आहेत.
आजपासून 'या' गोष्टी महागणार :पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर, वाहने, विमा प्रीमियम (Insurance premium) महागण्याची शक्यता आहे. तसेच क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल बँक लॉकरचे नियम बदलणार आहे.
भाजप मेळावा आणि नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार (BJP meeting in Sangli) :आज सांगलीत भाजप मेळावा आणि नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार होणार आहे. सकाळी 11 वाजता कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत.
आज धुळ्यात भव्य मॅरेथॉन (marathon in Dhule) : आज सकाळी 8 वाजता धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे नववर्षानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
युवक बिरादरी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराला सुरुवात (Blood Donation Camp organized by Youth Fraternity) धुळे शहरातील युवक बिरादरी संस्थेच्या वतीने रक्तदान करून नववर्षाचे स्वागत केले जाते. गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. आज रात्री 10 वाजता या रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे.
हिंदू धर्म जागरण समितीद्वारे 'या' मागणीसाठी आज रॅली (Hindu Dharma Jagran Samiti Rally) : नागपूर हिंदू धर्म जागरण समितीद्वारे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी आज रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता नागपूर जिल्ह्यातील पारडी परिसरात पुनापूर या ठिकाणी रॅली काढली जाणार आहे.