मुंबई : आज ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी होणार आहेत. विधीमंडळात आज ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन होईल. जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक आज आक्रमक भूमिका घेणार आहेत. आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री घेणार मोदींची भेट घेणार आहेत. तसेच अधिवेशनात महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता (Top News Today In Marathi) आहे.
आज ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी :पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Bal Diwas program) दुपारी साडेबारा वाजता दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ‘वीर बाल दिवसानिमित्त’ होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांचे ‘शबद कीर्तन’ होणार असून, पंतप्रधान त्यातही सहभागी होतील. तसेच, यावेळी नवी दिल्लीत निघणाऱ्या मुलांच्या मार्च पास्ट म्हणजेच फेरीलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.
आज ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन :आज ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray in winter session) समर्थनार्थ विधीमंडळात शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई नागपूरात दाखल झाले (Marathi News) आहेत.
जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( suspension of Jayant Patil) यांना विधानसभेतून या अधिवेशन काळापुरते निलंबित केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात न बसण्याचा निर्णय घेतला होता. आजही जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात आजही विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत. सकाळी १० वाजता महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यानंतर सभागृहात बसायचे की नाही, यासंदर्भात विरोधी पक्ष निर्णय घेणार आहेत.