महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे काय असणार आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर - Sanjay Raut on a visit to Nashik today

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Minister Anil Deshmukh ) यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सीबीआयने दाखल केलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. उदयनराजे सातारमधील जलमंदीर या निवासस्थानातून दुपारी 12.30 वाजता निघणार. दुपारी 1 वाजता ते सातारमधील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजही कोकण दौऱ्यावर ( Raj Thackeray on Konkan tour ) आहेत.

Top News Today
महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Dec 2, 2022, 7:03 AM IST

मुंबई : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर वाचा. (Read Top News Today ) खासदार उदयनराजे भोसले ( Udayanaraje Bhosale ) आज रायगडावर जाणार आहेत. उदयनराजे सातारमधील जलमंदीर या निवासस्थानातून दुपारी 12.30 वाजता निघणार आहे. दुपारी 1 वाजता ते सातारमधील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर वाई मधील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. तसेच ते उद्या रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम करतील.

  • अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी :राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Minister Anil Deshmukh ) यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सीबीआयने दाखल केलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांकडून हायकोर्टात आव्हान. ईडीने याच प्रकरणात दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मिळाल्याने सीबीआयच्या प्रकरणातही जामीनास पात्र असल्याचा देशमुखांचा दावा आहे.
  • खासदार उदयनराजे भोसले ( Udayanaraje Bhosale ) आज रायगडावर जाणार : उदयनराजे सातारमधील जलमंदीर या निवासस्थानातून दुपारी 12.30 वाजता निघणार. दुपारी 1 वाजता ते सातारमधील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर वाई मधील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. तसेच ते उद्या रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम करणार आहेत.
  • राज ठाकरे यांचा कोकण दौरा :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजही कोकण दौऱ्यावर ( Raj Thackeray on Konkan tour ) आहेत. ते आज 9.30 वाजता आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे दर्शन घेतील. त्यानंतर कणकवली येथे दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार असून खारेपाटणमध्ये मुक्काम करतील.
  • संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर :संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर ( Sanjay Raut on a visit to Nashik today ) असून शुक्रवारी ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी 10 वाजता सुरु होईल. नांदगाव मतदारसंघात जिल्हा प्रमुख संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, दुपारी 12.30 वाजता. नाशिक शहारात मेळावा, सायंकाळी 5 वाजता. जिल्ह्यातील ठाकरे गटातील काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व आहे. संजय राऊत उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आहेत. जेलमधून बाहेर आल्यावर राऊतांचा हा पहिलाच दौरा आहे.
  • सूचना मंत्रालयाशी निगडीत स्थायी समितीची आज बैठक : सूचना मंत्रालयाशी निगडीत स्थायी समितीची आज बैठक होणार आहे. मागच्या आठवड्यात एम्सचा सर्व्हेर हॅक झाला होता. गुरुवारी मुंबई विमानतळाचा सर्वरही डाऊन होता. जलशक्ती मंत्रालयाचं ट्विट हँडलही हॅक करण्यात आलं होतं. याबाबत ही बैठक बोलावण्यात आली आहे, संसद भवन एनेक्सी, सकाळी 11.30 वाजता.
  • अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर :विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी शहरातील विकास कामांची पाहणी झाल्यानंतर विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेणार आहेत.
  • पाठक बाई आणि राणादाचे आज लग्न :पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर आणि राणादा म्हणजेच हार्दिक जोशी खऱ्या आयुष्यात आज विवाहबंधनात अडकणार आहेत. पुण्यातील सिद्धी बॅक्वेट हॉलला त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून विधी सुरु होतील. दुपारी 12 वाजता लग्न होईल. संध्याकाळी रिसेप्शन असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details