आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या त्यांच्या विशेष कार्यक्रमातून देशातील जनतेचे संबोधन करणार आहेत. ते कोरोना व नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत या कार्यक्रमातून बोलण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काश्मीर मुद्द्यावरही बोलण्याची शक्यता आहे.
केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह हे आज लेह-लद्दाख दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी सैन्य दलाशी भेट घेतील व त्यांच्याशी चर्चा करतील.
आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्र शेखर आझाद आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते ही पत्रकार परिषद घेणार असून निवडणुकीत ते आपले उमेदवार उतरविण्याची शक्यता आहे.
भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी धावपटू म्हणजे पी.टी.उषाचा आज जन्मदिवस आहे. 1980 मध्ये तिने प्रथम ऑलंपिकमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रँकसूटमध्ये धावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. 1982 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने 100 व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत दोन रौप्य पदके जिंकली. तर 1983 मध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई ट्रॅक अॅन्ड फिल्ड चँपियन्स स्पर्धेत तिने 400 मीटर स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. पी.टी. उषाने 1986 मध्ये सोल येथे झालेल्या दहाव्या आशियाई स्पर्धेत 4 सुवर्ण व 1 रौप्यपदक जिंकली होती. तिने आपल्या कारकिर्दीत 100 हून जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.