राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या तसेच 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी भाजप प्रतिनिधी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र आजच्या दिवशी 37 वर्षांपूर्वी म्हणजेच 1983 साली भारताने कपील देव यांच्या नेतृत्वात भारताचे इतिहासा पहिल्यांदाच एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. लॉर्ड्स येथे झालेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 43 धावांनी पराभूत केले होते.
विश्वचषक जिंकल्यानंतरचे छायाचित्र देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण होणार आहे. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 44 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक वेळा लसीकरण ठप्प झाले आहे.
राज्यात मान्सून दाखल झाला असून आज कोकण, मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते झींझक आणि रुरा रेल्वे स्थानकाला भेट देणार आहेत. या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या नुतनिकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्रवादी चर्चा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपक्रमामध्ये शुक्रवारी( दि. 25 जून ) सायंकाळी 4 वाजता आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
अभिनेत्री कंगणा रनौतच्या पासपोर्टबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील 90चे दशक गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर हीचा आज वाढदिवस आहे. कपूर परिवारातील महिला व मुली चित्रपटापासून दूर होते. मात्र, करिश्माने परिवारातील विरोध झुगारत करिश्मा कपूरने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिने अभिनयासाठी तिचे शिक्षणही अर्धवट सोडले होते. 1991 साली तिचा पहिला चित्रपट 'प्रेम कैदी' प्रदर्शित झाला होता.
मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. सईचा जन्म 25 जून 1986 रोजी सांगलीत झाला. 2008 साली 'सनई चौघडे' या चित्रपटातून सईने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने आजपर्यंत विविध आव्हानात्मक भूमिका साकारल्या. 2013 साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सईला एक वेगळी ओळख दिली.
अभिनेता आफताब शिवदासानी याचा आज वाढदिवस आहे. आफताब वयाच्या नवव्या वर्षी 1987 साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर इंडीया' या चित्रपटातून सिनेसृष्टीत बाल कलाकार म्हणून पदार्पण केले. त्यानंतर 1988 साली प्रदर्शित झालेल्या 'शहंशाह' या चित्रपटात त्याने त्यानंतर त्याने अभिताभ बच्चन यांच्या बालपणाची भूमिका निभावली होती. वयाच्या 19 वर्षी त्याने रामगोपाल वर्मा यांच्या 'मस्त या चित्रपटात' मुख्य भूमिका बजावली होती.
अधिक बातम्यांसाठीयेथे क्लिककरा...