महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - World Test Championship Final news

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

न्यूज टूडे
न्यूज टूडे

By

Published : Jun 23, 2021, 6:36 AM IST

  • आज मंत्रिमंडळाची बैठक असून या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. तसेच पावसाळी अधिवेशनासाठीच्या विविध मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
    मंत्रालय
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेणार असून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
  • राज्यात मान्सून दाखल झाला असून आज कोकण, मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
    संग्रहित छायाचित्र
  • मुंबई महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन बैठक होणार आहे. मुंबईतील विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असून नालेसफाईसंदर्भात विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
    बृहन्मुंबई महापालिका
  • देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण होणार आहे. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 44 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक वेळा लसीकरण ठप्प झाले आहे.
    संग्रहित छायाचित्र
  • कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांचा आज वाढदिवस आहे. ते 39 वर्षांचे झाले आहेत. गत निवडणूक ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. कोकणचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सतत आक्रमक भूमिक घेतात. यामुळे ते चर्चेत असतात.
    आमदार नितेश राणे
  • भारत बायोटेकची जागतीक आरोग्य संघटनेसोबत लसीकरणासंदर्भात आज बैठक होणार आहे.
    भारत बायोटेक
  • आज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा अंतिम दिवस आहे. हा सामना भारत व न्युझीलंड या दोन देशादरम्यान सुरू आहेत. पाचव्या दिवसअखेर भारताने न्यूझीलंडसमोर ३२ धावांची आघाडी घेतली आहे. आज जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरणार आहे.
    स्पर्धेतील छायाचित्र

अधिक बातम्यांसाठीयेथे क्लिककरा...

ABOUT THE AUTHOR

...view details