Top News Today : आजच्या महत्त्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर - ॲट्रॉसिटी ॲक्ट
आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊ (Top News Today in Marathi) या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर (Read Top News Today ) वाचा.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. याबरोबरच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. ( Gram Panchayat Election Result 2022 )
- ग्रामपंचायत निवडणूक निकाल : ( Gram Panchayat Election Result 2022 ) राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे.
- विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस : ( Winter Assembly Session ) महाविकास आघाडीची सकाळी 9 वाजता अजित पवारांच्या निवास्थानी बैठक होणार आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आंदोलन करणार आहेत.
- वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार :राज्यातील दहा वारकरी संघटना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ( Chief Minister Eknath Shinde ) भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्यासोबतच महापुरूषांवरील अक्षेपार्ह वक्तव्याबाबत ही भेट असणार आहे.
- पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण :नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आवारात आज माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.
- मनसेची बैठक :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.
- ॲट्रॉसिटी याचिकेवर सुनावणी :भाजप नेते चंद्रकांत पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राम कदम यांच्यासह मुंबई पोलिस आयुक्तांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरोधात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंकडून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.
- हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी प्रदर्शित केली जाणार :भारतात 13 जानेवारी पासून सुरु होत असलेल्या हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी आज भारतीय नौदलाच्या आयएनएस मोर्म्युगाव युद्धनौकेवर प्रदर्शित केली जाणार आहे. 13 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान ओडिसातील कलिंगा, भुवनेश्वर आणि राहुरकेला येथे हॉकी विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.
- भैरो सिंग यांचे अंतिम संस्कार :1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भैरो सिंग यांनी लोंगेवाला पोस्टच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावर बनलेल्या 'बॉर्डर' चित्रपटात सुनील शेट्टीने ही व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटात त्याला हुतात्मा म्हटले गेले असले तरी. काही दिवसांपूर्वी आजारी पडल्याने त्यांना जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला . आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
- महाकालेश्वर मंदिरात मोबाईल बंदी :मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिरात आजपासून मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, महाकाल लोकांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी असणार नाही. महाकालेश्वर मंदिर परिसरात फिल्मी गाण्यांवर रील्स बनवणे आणि वादग्रस्त छायाचित्रे काढण्याचे प्रकार समोर आले आहेत, त्यामुळे मंदिर समितीने मोबाइल फोनवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
- आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस :दरवर्षी 20 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा केला जातो. एकतेचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २० डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून घोषित केला आहे. गरिबी कमी करण्यासाठी संबंधित देशांतील गरिबांची सार्वत्रिक मूल्ये ओळखणे आणि स्वतंत्र राज्यांच्या स्वाक्षरीनुसार त्याचे मॉडेल तयार करणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे.
Last Updated : Dec 20, 2022, 7:27 AM IST