महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top News Today : आजच्या महत्त्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर - लेफ्टनंट कर्नल पुरोहित

आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊ (Top News Today in Marathi) या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर (Read Top News Today ) वाचा.

Top News Today
महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

By

Published : Dec 18, 2022, 7:17 AM IST

मुंबई :आज दिवसभरात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान, फीफा विश्वचषक 2022, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये चहापानचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच बेळगावमध्ये संभाजीराजेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण होणार आहे. अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी मतदान, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन आहे. या दिवसभरातीला महत्त्वाच्याघडामोडींवर (Top News Today in Marathi) नजर असणार आहे.

आज मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान (Voting for Gram Panchayats) :राज्यातल्या मुदत संपलेल्या 7751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबरला (Marathi news) होईल.

फीफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022):कतारमध्ये आज अर्जेंटीना आणि फ्रांसमध्ये मेगा फायनल होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सामना सुरु होईल. फ्रान्स सध्या विश्वविजेता आहे, तर अर्जेंटिनाने अखेरचा विश्वचषक 1968 मध्ये जिंकला होता.

आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये चहापानचा कार्यक्रम :आजराज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पूर्वसंध्येला नागपूरमध्ये चहापानचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर दुपारी 1 वाजता विरोधी पक्ष नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. यानंतर संध्यकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे

आज संभाजीराजेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण :आजसंभाजीराजे छत्रपतींच्या (Sambhaji Raje Chhatrapati) हस्ते बेळगावमधील होणगा गावात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजीराजे नियोजित बेळगाव दौरा व स्वराज्य संघटनेचे झी स्टुडीओ वरील हल्लाबोल आंदोलन याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत.

आज अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी मतदान (Gram Panchayat Election):अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक आज होणार आहे. सरपंचपदासाठी 1279 तर सदस्य पदासाठी 4796 उमेदवार रिंगणात आहेत.

लेफ्टनंट कर्नल पुरोहित (Lt. Col. Purohit) यांच्यावरील पुस्तकाचे आज प्रकाशन :लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर स्मिता मिश्रा यांनी लिहीलेल्या लेफ्टनंट कर्नल पुरोहित ‘द मॅन बिट्रेयड’ या पुस्तकाचे प्रकाशन (Book release today) आज पुण्यातील एस पी कॉलेजमध्ये होणार आहे. माजी आयपीएस अधिकारी जयंत उमराणीकर, सत्यपाल सिंह आणि संजय बर्वे हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details