मुंबई :आजच्या दिवसभरातीलमहत्त्वाच्या घडामोडींचाथोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. आज नगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिरे, आज 36 गुण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार, आज पावसाची शक्यता, गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर, २४ तासांत भारतात कोविडचे नवे रूग्ण, आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न, मिली चित्रपट आज रिलीज होणार या महत्त्वाच्या घडामोडी आहेत.
आज सकाळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न(Devendra Fadnavis) : आज कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.
आज नगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिरे :दर बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र व तपासणीसाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात दिव्यांग येत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाचे दैनंदिन नियोजन कोलमडून जायचे. आता जिल्हा शासकीय रुग्णालयाने शुक्रवार 4 नोव्हेंबर पासून नगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिरे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आज 36 गुण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार(Movie Release) : समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेला ‘36 गुण’ हा आजच्या पिढीला जवळचा वाटेल असा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.