मुंबई :आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. आज छठ पर्वला सुरवात, आरोग्यमंत्र्यांचा आज अहमदनगर दौरा, पंतप्रधान मोदी चिंतन शिबिरात सहभागी होणार, मुख्यमंत्री महाबळेश्वरात, एसटी महामंडळाच्या संचालक मंडळांची बैठक, सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी, गिरीश महाजनांची आज धुळ्यात बैठक, दहशतवाद विरोधी समितीची आजपासून बैठक या विशेष घडामोडी (Marathi News) आहेत.
आजपासून छठ पर्वला सुरवात(Chhath festival 2022) : आजपासून चार दिवसीय छठ उत्सव आजपासून सुरू होत आहे.
आरोग्यमंत्र्यांचा आज अहमदनगर दौरा (Health Minister Ahmednagar Visit Today) : आज राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. ते चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक येथे अभिवादन करतील. त्यानंतर ते भाजप नेते राम शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.
आज पंतप्रधान मोदी चिंतन शिबिरात सहभागी होणार (PM Modi Participate in Chintan Camp Today) : आज सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत. ते शिबीराला संबोधित करतील. या चिंतन शिबिराचे आयोजन 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी सुरजकुंड, हरियाणा येथे करण्यात आले आहे.
आज मुख्यमंत्री महाबळेश्वरात (Chief Minister Shinde today in Mahabaleshwar) : आज दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वरात उपस्थित असणार आहे. ते आज महाबळेश्वरमध्ये मुक्काम करतील. तसेच ते संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
आज एसटी महामंडळाच्या संचालक मंडळांची बैठक (Board of Directors of ST Corporation Meeting ) :आज एसटी महामंडळाच्या संचालक मंडळांची 302 वी बैठक होणार आहे. एसटीला 4 हजार गाड्यांसोबतच महागाई भत्ता आणि उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यावर एसटीचा भर असेल.
आज सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी (Hearing on Satyendra Jain bail application) : सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. परंतु सत्येंद्र जैन यांनी जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केल्यामुळे त्यांच्या जामिनावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे.
गिरीश महाजनांची आज धुळ्यात बैठक(Girish Mahajan meeting in Dhule) : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत धुळ्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
दहशतवाद विरोधी समितीची आजपासून बैठक(UNSC Anti Terrorism Committee meeting) : आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक मुंबईत सुरू होणार आहे. या बैठकीत दहशतवाद्यांकडून होत असलेल्या इंटरनेटचा वापर, नवीन पेमेंट सिस्टीम आणि ड्रोनचा सामना करण्याच्या पद्धतींवर चर्चा पार पडणार आहे.