महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा, आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी - Silver trumpet to bodyguard

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या (Read Important Top News ) बातम्या वाचा. (Marathi news)

Top News Today
दिवसभरातील ठळक घडामोडी

By

Published : Oct 27, 2022, 7:30 AM IST

मुंबई :आजच्या दिवसभरातीलमहत्त्वाच्या घडामोडींचाथोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. आज आज भारताचा दुसरा सामना, राष्ट्रपतींच्या हस्ते अंगरक्षकांना सिल्वर ट्रम्पेट प्रदान, आदित्य ठाकरेंचा आज नाशिक दौरा, आज अमित शाह यांचा हरियाणा दौरा, आज संरक्षण मंत्र्यांचा श्रीनगर दौरा,आज अमित शाह यांचा हरियाणा दौरा, शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावाया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आहेत.

आज भारताचा दुसरा सामना (T20 World Cup) :आज ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा नेदरलँडविरोधात सामना आहे.पण रोहित शर्मा आणि भारतीय संघव्यवस्थापन या सामन्यासाठी संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. त्यात सर्वात जास्त हार्दिक पंड्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतींच्या हस्तेअंगरक्षकांना सिल्वर ट्रम्पेट प्रदान(Silver trumpet to bodyguards ) : आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना सिल्वर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर प्रदान करणार आहेत. हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरेंचा आज नाशिक दौरा (Aditya Thackeray Nashik visit today) :आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज पुण्यात दिवाळी निमित्ताने कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील भेटणार अशी माहिती आहे. पुण्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे सिन्नर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत.

आज संरक्षण मंत्र्यांचा श्रीनगर दौरा (Defense Minister Rajnath Singh Srinagar Visit) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगर दौऱ्यावर आहेत. ते इंफेंट्री-डेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तेथे शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे.

आज अमित शाह यांचा हरियाणा दौरा (Amit Shah Haryana Visit ) : आजअमित शाह यांचा हरियाणा दौऱ्यावर आहेत. ते आजहरियाणा येथील सूरजकुंड येथे होणाऱ्या विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या 'चिंतन शिबिराचे' अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चिंतन शिबिराला दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी संबोधित करणार आहेत.

आज शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा (Farmer Study Gathering Today ) : आज आटपाडी मधील कृषितंत्र विद्यालयाच्या प्रांगणात आटपाडी, सांगोला आणि तासगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती शरद पवार यांची आहे. तर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर, के. जे. जॉय, हिमांशु कुलकर्णी अब्राहम सॅम्युएल या मान्यवर मेळाव्यास उपस्थित राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details