महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top news Today : एका क्लिकवर वाचा, आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी - Today BJP Constitution Rally in Sindhudurga

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात (Marathi news) आढावा. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्या (Top news Today) वाचा.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Top news Today

By

Published : Oct 21, 2022, 7:09 AM IST

मुंबई :आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा वाचा. दिवाळीचा पहिला दिवस, मोदींचा केदारनाथ दौरा, अनिल देशमुखांच्या जामिनावर आज सुनावणी या घटनांवर आज महत्त्वाच्या असणार आहेत.

आज दिवाळीचा पहिला दिवस (Diwali 2022) : आज वसुबारस म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस आहे. आजपासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. आजच्या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि दिवाळीचा शुभ पर्वाची सुरुवात केली जाते.

आजपासून दिल्लीत 'दीये जलाओ पटाखे नहीं' मोहीम सुरू( Diwali festival) : आजपासून ऑक्टोबरपासून दिल्लीत 'दीये जलाओ पटाखे नहीं' ही जनजागृती मोहीम सुरू होणार आहे. दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड होऊ शकतो, असं पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी सांगितलं. यासोबतच स्फोटक कायद्याच्या कलम 9B अंतर्गत राजधानीत फटाक्यांचं उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर मुंबईतही विना परवाना फटाके विक्रीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज केदारनाथ दौरा (PM Narendra Modi Kedarnath visit) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ दौऱ्यावर आहेत. ते आज केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दर्शनाला जाणार आहेत. केदारनाथला मोदी सकाळी 8.30 वाजता पोहचतील आणि पूजा करतील. त्यांच्या हस्ते रोपवे योजनेचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मोदी बद्रीनाथाला जाऊन पूजा करतील. बद्रीनाथलाही रोपवे आणि विविध योजनांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.

अनिल देशमुखांच्या जामीनावर आज सुनावणी (Anil Deshmukh Bail Hearing Today) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सीबीआय केसमधील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे. देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आज दुपारी 3 वाजता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे.

आज शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकत्र दिसणार (Shinde Fadnavis and Raj Thackeray together): आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकाच कार्यक्रमात दिसणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आले. त्यानिमित्त हे तिन्ही महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उदघाटन पार पडणार आहे.

आज सिंधुदुर्गात भाजपकडून संविधान रॅली (Today BJP Constitution Rally in Sindhudurga) : शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असून, त्यांनी चौकशीला सामोरे न जाता कार्यालयावर मोर्चा काढत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असे विरोधक म्हणत आहेत. त्यासाठी भाजपकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. यामध्ये आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा(CM DCM Nashik Visit Today): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दुपारपर्यंत शहरातील विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे शिंदे गटाच्या नाशिकच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन पार पडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details