मुंबई : क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो, त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष असते.
बीटकॉईन :हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय. आज बीटकॉइनची किंमत 18,55,149 रूपयांच्या आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,32,122 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,461 रूपये आहे.
क्रिप्टोकरन्सीचे फायदे : या प्रकारच्या बँकिंगचा मुख्य फायदा क्रिप्टोकरन्सी डेबिट कार्ड हा आहे. या बँकिंगमध्ये डिजिटल चलन इतर कोणत्याही चलनाप्रमाणे व्यवहार करण्यासाठी किंवा रोख रक्कम म्हणून काढण्याची परवानगी देतात. अनेक फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपन्या चार्टर्ड बँक किंवा डेबिट कार्डनिर्मिती कर्त्यांसोबत भागीदारी करत आहेत. या भागीदारीद्वारे क्रिप्टोकरन्सीचे रुपांतर डॉलरमध्ये करण्यात येते. अनेक डेबिट कार्ड कंपन्यानी डिजिटल फंड स्वीकारण्यास सुरवात केली आहे. क्रिप्टोकरन्सी बँकिंगद्वारे आपण डिजीटल वॉलेटच्या माध्यमातून पैसे वापरू शकतो. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो, त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते.