मुंबई :आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर (Cryptocurrency Prices in India) होतात.भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. विदेशाप्रमाणाचे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत वाढ पाहावयास मिळाली. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. ( Cryptocurrency Prices 31 December 2022 ) आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घ्या.
क्रिप्टोकरन्सीचे फायदे :क्रिप्टोकरन्सी हे एक सुरक्षित व गोपनीय पेमेंट सेवा पुरविणारे साधन आहे. हे ब्लॉक चेन वर आधारित कार्य करत असल्यामुळे या मध्ये सहसा फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत. व्यवहार करताना फी ही खूप कमी राहते. व्यवहारावर बंधने नाहीत. जगात कुठेही कोणत्याही व्यक्तीला पैशाची देवाणघेवाण करता येते . क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण दिवसाचे 24 तास आठवड्याचे 7 ही दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस कधीही व्यवहार करू शकतो.क्रिप्टोकरन्सीचं एक्सचेंज स्वरूप खूप सुरक्षित आहे. त्याचसोबतच याचा व्यवहार हा किफायतेशीर आहे. बिटकॉइन व्यवहारांसाठी खातेवही तयार केले जाते. जगातील लाखो व्यापारीही बिटकॉइनने व्यवहार करतात. मात्र अद्याप कोणत्याही मध्यवर्ती बँकेने त्याला मान्यता दिलेली नाही. अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्याही बिटकॉइन स्वीकारतात. इंटरनेटच्या जगात अनेक एक्सचेंज आहेत जे ते खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध करतात. इंटरनेटवरील अनेक वेबसाइट्स आणि अॅप्सद्वारे त्याची खरेदी आणि विक्री केली जाते. यामध्ये खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती लपवली जाते. या करन्सीद्वारे फंड लवकर ट्रान्सफर होतात असं म्हटलं जातं.