महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : कसा चालतो बिटकॉईन्सचा व्यवहार ; जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर - बायनान्स

बिटकॉइनला आभासी चलन किंवा डिजिटल करंसी असे संबोधले जाते. हि एक लोकप्रिय क्रिप्टोकरंसी आहे. बिटकॉइन हि एक अशी डिजिटल करंसी आहे, ज्याला तुम्ही हाताने स्पर्श करू शकत नाही. किंवा उघड्या डोळ्यांनी बघू देखील शकत (Cryptocurrency Prices 8 December 2022) नाही.

Cryptocurrency Prices Today
क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर

By

Published : Dec 8, 2022, 6:41 AM IST

मुंबई :कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन 'छापत' (Cryptocurrency Prices in India) नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करत आहे.

क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर

बिटकॉईन्सचा व्यवहार :या व्हर्च्युअल चनलाच्या विश्वात अनेक प्रकारची चलने आहेत. पण बिटकॉईन हे सगळ्यांत जास्त प्रसिद्ध आहे. बिटकॉईन विकत घेण्यासाठी युजरकडे 27 ते 34 कॅरेक्टरचा एक खास अॅड्रेस असणे गरजेचे आहे. हा अॅड्रेस एखाद्या आभासी पोस्टबॉक्ससारखे काम करतो. या पोस्टबॉक्स मधूनच बिटकॉईन्सचा व्यवहार होतो. या पत्त्याची नोंद कुठेही नसल्याने वापरकर्त्यांना त्यांची ओळख गोपनीय ठेवता (Cryptocurrency Prices Today in India) येते.

क्रिप्टोकरन्सी दर :बीटकॉइनची किंमत 13,85,296 आसपास आहे. आज इथेरिअमची किंमत 1,01,258 रूपये आहे. बायनान्सची किंमत 23,343 रूपये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details