महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 : 'शास्त्रज्ञांच्या जिद्द आणि चातुर्याला सलाम!', चांद्रयान 3 च्या यशस्वी उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट - Narendra Modi

चांद्रयान 3 च्या यशस्वी उड्डाणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत इस्रोचे अभिनंदन केले आहे. 'ही कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे', असे मोदी म्हणाले.

Chandrayaan 3 Narendra Modi
चांद्रयान 3 नरेंद्र मोदी

By

Published : Jul 14, 2023, 4:01 PM IST

मुंबई :इस्रोच्या चांद्रयान 3मिशनाला2020 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र कोरोना महामारीमुळे यामध्ये बरेच अडथळे आले होते. अखेर शुक्रवारी दुपारी चांद्रयान 3 अवकाशात झेपावले. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 चे लॉंचिंग यशस्वी झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोला गुडलक विश केले आहे.

'भारताच्या अंतराळ मोहिमेचा नवा अध्याय' : नरेंद्र मोदी म्हणाले की, 'चांद्रयान 3 भारताच्या अंतराळ मोहिमेचा एक नवीन अध्याय लिहित आहे. या मोहिमेने प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षांनी उंच भरारी घेतली आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम!'

इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले : चांद्रयान 3 च्या यशस्वी उड्डाणानंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ते म्हणाले की, 'हा खरोखरच भारतासाठी गौरवाचा क्षण आहे. यासाठी इस्रोच्या टीमचे आभार. तसेच भारताचे अंतराळ क्षेत्र सक्षम केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही आभार.' केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले की, 'भारताने आज चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ऐतिहासिक अंतराळ प्रवासाला सुरुवात केली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक अभिनंदन ज्यांच्या अथक परिश्रमाने आज भारत एक उल्लेखनीय अंतराळ प्रवास लिहिण्याच्या मार्गावर आहे'.

'भारतासाठी अभिमानाचा क्षण' : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणावर इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन म्हणाले की, 'इस्रोच्या टीमचे अभिनंदन. तुम्ही सर्वांनी दिलेल्या नैतिक पाठिंब्यासाठी आणि तुम्ही दाखवलेल्या उत्साहासाठी आभार. आम्ही आशा करूया की हे एक अतिशय यशस्वी मिशन असेल.' चांद्रयान 3 च्या यशस्वी उड्डानानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देखील ट्विट केले आहे. 'अभिमानाचा क्षण, भारताचे अभिनंदन! चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल टीम इस्रोचे अभिनंदन. हे खास क्षण कायम लक्षात राहतील! आज प्रत्येक भारतीयाला खूप अभिमान वाटतो आहे. असे ट्विट मांडविया यांनी केले.

हेही वाचा :

  1. Chandrayaan 3 : इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावले!
  2. Chandrayaan 3 Launch : चांद्रयान ३ चे मोहिमेत सुरतच्या कंपनीने 'हे' दिले महत्त्वाचे योगदान
  3. Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी अनेक देशांची इस्रोला मदत करण्याची तयारी: जाणून घ्या काय म्हणाले खगोलशास्त्रज्ञ रमेश कपूर

ABOUT THE AUTHOR

...view details